आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जज आत्महत्याप्रकरणी ५ न्यायाधीशांवर गुन्हा, न्या. जवळकारांना आत्महत्येस प्रवृत्त केले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दारव्हा (जि. यवतमाळ) येथील न्यायाधीश अनुप जवळकार यांनी ६ मार्चला चांदूर रेल्वे परिसरात रेल्वे रुळावर आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांच्या सुसाइड नोटच्या आधारे त्यांचे बंधू अमोल यांनी तक्रार दिली होती. त्यावरून चांदूर रेल्वे पोलिसांनी गुरुवारी यवतमाळातील पाच न्यायाधीशांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
जवळकार यांच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात होते. दरम्यान, त्यांच्या घरातील साहित्य काढताना अमोल जवळकार यांना एक चिठ्ठी आढळली. त्यामध्ये आत्महत्येला यवतमाळचे ५ न्यायाधीश जबाबदार असल्याचा उल्लेख होता. यानंतर अमोल यांनी चांदूर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

चिठ्ठीची पडताळणी
अमोल जवळकार यांनी दिलेल्या चिठ्ठीची आम्ही ‘हँडरायटिंग एक्स्पर्ट'कडून तपासणी करून घेणार आहोत.
गिरीश बोबडे, ठाणेदार, चांदूर रेल्वे.