आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लायसन्स ‘ऑनलाइन अपाॅइन्टमेंट’साठी मोबाइल अॅप्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आरटीओकडून मिळणारे लर्निंग परमनंट लायसन्स काढण्यासाठी मागील दीड वर्षांपासून ‘ऑनलाइन अपाॅइन्टमेंट’ घ्यावी लागत आहे. मात्र, ही अपॉइंन्टमेंट घेण्यासाठी सर्वसामान्यांना नाहक आर्थिक फटका बसत आहे. जी अपाइन्टमेंट’ विनाखर्चाने मिळायला पाहिजे, त्यासाठी काही शहरात खर्च करावा लागत आहे. मात्र, सर्वसामान्यांची सोय व्हावी तसेच आरटीओची कोणतीही माहिती सहज उपलब्ध व्हावी, ‘ऑनलाइन अपॉइन्टमेंट’ विनाखर्चाने घेता यावी, या सगळ्या बाबी समोर ठेवून आरटीओकडून ‘आरटीओ महाराष्ट्र’ नावाचे मोबाइल अॅप्स तयार करण्यात आले असून, लवकरच हे अॅप्स नागरिकांसाठी कार्यान्वित होणार असल्याचे आरटीओच्या मुख्य कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
राज्यातील अनेक आरटीओमध्ये सप्टेंबर २०१४ पासून लायसन्स काढण्यासाठी ‘ऑनलाइन अपाॅइन्टमेंट’ घ्यावी लागत आहे. या अपाॅइन्टमेंटशिवाय लायसन्सच काढता येत नाही. ही अपॉइन्टमेंट घेण्यासाठी संगणकावर इंटरनेट तसेच ‘अॅक्रॉबॅट रीडर एक्स’च्या पुढील व्हर्जन पाहिजे. मात्र, सर्वसामान्यांना या किचकट प्रक्रियेतून जाताना अनेक अडचणी येतात. त्यामुळेच ५० रुपये देऊन ‘ऑनलाइन अपाॅइन्टमेंट’ घ्यावी लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, आरटीअोने या समस्येवर मात करण्यासोबतच नागरिकांना इतरही आवश्यक माहिती सहजरीत्या तेही विनापैशाने उपलब्ध व्हावी म्हणून ‘आरटीओ महाराष्ट्र’ नावाचे अॅप्स तयार केले आहे. या अॅप्सची कार्यालयस्तरावर यशस्वी चाचणीसुद्धा झालेली आहे. आता लवकच हे अॅप्स सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे स्मार्ट फोनधारकांना लवकरच घरी बसून लायसनसाठी आरटीओची ‘ऑनलाइन अपाॅइन्टमेंट’ तसेच इतरही माहिती घेता येणार आहे, अशी माहिती आरटीओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

प्रवासादरम्यान अडचण आल्यास मिळेल मदत
अनेकदा प्रवास करताना विविध अडचणी येतात. एखाद्यावेळी अपघात झाल्यास त्या ठिकाणापासून रुग्णालय किती अंतरावर, रुग्णालयाचा मार्ग कसा आहे, अशी विस्तृत माहिती या अॅप्सद्वारे गरजेच्या वेळी घेता येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी शेअर टॅक्सी, रिक्षा आहेत त्या ठिकाणांचे आरटीआेने ठरवलेले दर काय आहे, हीसुद्धा माहिती ‘आरटीओ महाराष्ट्र’ या अॅप्सवर मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...