आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२ शिक्षण सेवकांना एका दिवसात इओंनी दिली संशयास्पद मान्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्य शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातली असताना नूतन विदर्भ शिक्षण मंडळाने नियुक्त केलेल्या १२ शिक्षण सेवकांना एका दिवसात शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या अतीजलद संशयास्पद मान्यता प्रकाराने शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

राज्यभरात अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर असून, नूतन विदर्भ शिक्षण मंडळाने आरक्षणाच्या नियमांना डावलून एस. टी. संवर्गातील शिक्षण सेवकांना अतिरिक्त ठरविल्यानंतर झालेल्या चाैकशीत शिक्षणाधिकारी (माध्य.) सी. आर.राठाेड नूतन विदर्भ शिक्षण मंडळ यांचे संगनमत उघड झाले आहे. राज्यात अनेक संस्थांनी बाेगस विद्यार्थी संख्या दाखवून शिक्षण सेवकांच्या भरतीतून लाखाे रूपयांची कमाई केली. बाेगस विद्यार्थी संख्या दाखविल्याने राज्यभर अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर झाला. त्यामुळे राज्यशासनाने मे २०१२ राेजी शिक्षक भरतीवर बंदी घातली. मात्र त्यानंतर ही या बंदी काळात राज्यातील काही संस्थांनी आपली पाेळी शेकून घेतली. अश्या संस्थांमध्ये नूतन विदर्भ शिक्षण मंडळ आघाडीवर हाेते. नूतन विदर्भ शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये फुगीर बाेगस विद्यार्थी संख्या दाखवून शासनाकडे २२ पदांची मागणी केली. संस्थेच्या मागणीनूसार कुठलीही पडताळणी करता शिक्षणाधिकारी सी. आर. राठाेड यांच्या कार्यालयाने परवानगी पत्र क्र. ९५९/२०१४ दि. २६/२/२०१४ देऊन पदभरतीचा मार्ग प्रशस्त केला. संस्थेच्या कर्मचारी संख्येनुसार संस्थेत माेठ्या प्रमाणावर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा अनुषेश बाकी हाेता. त्यामुळे संस्थेला एससी १, एसटी ७, आेबीसी ७, एसबीसी १, व्हीजे १, एनटी (डी)१ खुल्या प्रवर्गातून जागा भरावयाच्या हाेत्या. नूतन विदर्भ शिक्षण मंडळाला २२ जागा भरण्यासाठी परवानगी पत्र मिळाल्यावर संस्थेने दि. २४ ते २९ मार्च २०१४ दरम्यान उमेदवारांच्या मुलाखती घेऊन १८ उमेदवारांची शिक्षण सेवक म्हणून निवड केली. नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या समन्वय समितीची सभा दि. १७ मार्च २०१४ राेजी झाली. या सभेतील ठराव क्र. नुसार शिक्षण सेवकांच्या नियुक्तीचा मान्यता प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याचे ठरले. त्यानंतरच्या घडामोडी संशयास्पद असून शिक्षणाधिकारी सी. आर. राठाेड यांनी अचानक दि. २१/५/२०१४ राेजी जा.क्र/.जि.प./शिअ/माध्य/शिबिर/२०१४ या पत्रानुसार तब्बल १२ पदांना मान्यता दिली. या मान्यता पत्रात नूतन विदर्भ शिक्षण मंडळाचा प्रस्ताव क्र. ३२०/१४ दि.२१/८/२०१४ असे स्पष्टपणे नाेंदविले आहे. २१ आँगस्ट २०१४ राेजी संस्थेने शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला ताे प्रस्ताव त्याच दिवशी शिक्षणाधिकाऱ्यांनी जलदगतीने मंजूर केल्याने शिक्षण सेवक पदांना दिलेली मान्यता संशयाच्या भाेवऱ्यात अडकली आहे. नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या २०१३-१४ च्या पटसंख्येनुसार २२ पदांची आवश्यकता हाेती तशी परवानगी शिक्षणाधिकाऱ्यांनीच दिली हाेती, तर २०१४-१५ मध्ये १२ पदांना मान्यता का देण्यात आली. २०१५-१६ च्या पटसंख्येनुसार मान्यता देण्यात आलेल्या शिक्षण सेवकांपैकी शिक्षण सेवक अतिरिक्त ठरले आहेत. २२ पदांची मान्यता प्राप्त करून घेणाऱ्या संस्थेत केवळ पदांची आवश्यक्ता रहावी, तर १३ पदे कमी झाल्याने संस्थेत वर्षांत किमान ५०० विद्यार्थी संख्या कमी झाली काय? की विद्यार्थीच नव्हते, असे अनेक प्रश्न समाेर आले आहेत. नूतन विदर्भ शिक्षण मंडळ शिक्षणाधिकारी यांच्या संगनमताशिवाय हा संशयास्पद मान्यता व्यवहार हाेऊ शकत नाही, असा दावा शिक्षण क्षेत्रातील जाणकार करीत आहे. याबाबत शिक्षणाधिकारी (माध्य.) सी. आर. राठोड यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांचा भ्रमणध्वनी उत्तर देत नव्हता.

अनुसूचित जमातीच्या शिक्षक सेवकांवरअन्याय : नूतनविदर्भ शिक्षण मंडळाला २२ शिक्षक सेवक भरण्याची परवानगी देण्यात आली हाेती. संस्थेला या जागांमध्ये अनुसूचित जाती(एस.टी.) संवर्गातून पदे भरणे बंधनकारक हाेते. संस्थेने घेतलेल्या मुलाखतीत तब्बल २६ एसटी उमेदवारांनी मुलाखती दिल्यात. यापैकी केवळ उमेदवारांची निवड करण्यात आली. संस्थेचे सचिव निनाद साेमण यांनी संस्थेच्या १७/४/२०१४ राेजीच्या सभेत सांगितले की, एस.टी. उमेदवारांचा प्रत्यक्ष मुलाखतीतील प्रतिसाद याेग्य नव्हता. सचिवांना नेमका कसा प्रतिसाद अपेक्षित हाेता, याचे गुढ कायम आहे. अंतिम निवडीत कु. मिनाक्षी एकनाथ टेकाम, कु. दीपाली रमेश मेश्राम, कु.रूपाली रमेश मेश्राम, रामसिंग दिलीप साेळंके यांची नावे अंतीम झाली हाेती. माञ यापैकी कु. दीपाली मेश्राम यांच्या पदाला शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिली नाही. २०१५-१६ च्या विद्यार्थी संख्येनुसार संस्थेत शिक्षक सेवक अतिरिक्त ठरले. नूतन विदर्भ शिक्षण मंडळाने आरक्षणाचे नियम डावलून कु. मीनाक्षी एकनाथ टेकाम रामसिंग दिलीप साेळंके अनुसूचित जमातीच्या शिक्षक सेवकांना अतिरिक्त ठरविले. संस्थेची शिक्षक सेवक अतिरिक्त ठरविण्याची पद्धती नियमबाह्य अनु.जमातीवर अन्याय करणारी असून शिक्षण उपसंचालक या प्रकरणी आज काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...