आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाले खोदायचे अन् पैसे काढायचे हेच आहे काय जलयुक्त शिवार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जलयुक्त शिवार योजनेंतर्गंत सर्वाधिक कामे ही नाला खोलीकरण रुंदीकरणाची करण्यात आली आहे. यामुळे केवळ पुराचे पाणी गावात घुसता वाहून जाणार आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी नेमकी कशी वाढेल, हा अनाकलनीय प्रश्न आहे. जलयुक्त शिवारची कामे करताना भूवैज्ञानिकांचा सल्ला घेता ही कामे केली जात असल्याने केवळ नाले खोदायचे अन् पैसे काढायचे, या उद्योगामुळे शिवार खरेच जलयुक्त होईल का, असा सवाल जि.प.च्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांनी गुरुवारी उपस्थित केला. स्थायी समितीच्या सभेतही सदस्यांनी जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार कामाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेण्याची मागणी सदस्यांकडून करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ठाकरे बोलत होत्या. सभेला जि.प.अध्यक्ष सतीश उईके, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, सरिता मकेश्वर आदींसह लघुसिंचन विभागाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी बोलताना ठाकरे म्हणाल्या की, जिल्ह्यातील विविध तालुक्यांत जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सर्वाधिक कामे नाला खोलीकरण रुंदीकरणाची करण्यात आली आहे. चांदूर बाजार तालुक्यातही मोठ्या प्रमाणात अशीच कामे करण्यात आली आहे. यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. परंतु, यामुळे केवळ पुराचे पाणी गावात घुसता थेट पूर्णपणे वाहून जाणार असल्याचा फायदा होणार आहे. हे पाणी जमिनीत कसे पुरणार हा प्रश्न आहे. तालुक्यातील बहुतांश भागात भूगर्भात चोपण आहे. त्यामुळे यातून पाणी जमिनीत मुरू शकत नाही. तालुका निवड समितीच्या सांगण्यावरून अशीच कामे करण्यात आली आहे. परंतु ही कामे करताना खोलीकरण रुंदीकरणामुळे जमीनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते किंवा नाही याबाबत भुगर्भ तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला नाही. कोट्यवधी रुपये खर्च करण्यापुर्वी तालुक्यातील विविध भौगोलिक रचनेनुसार भुवैज्ञानिकांचा सल्ला घेऊन जेथे बंधारा आवश्यक आहे तेथे बंधारे जेथे खोलीकरण आवश्यक आहे तेथे खोलीकरण करणे गरजेचे होते. परंतु याबाबत वैज्ञानिकांचा कोणताच सल्ला घेता सरसकट खोलीकरण रुंदीकरणाची कामे करण्यात आली. नाल्यांचे पाणी थेट वाहून जात असले तर शिवार जलयुक्त कसे होईल असा सवाल ठाकरे यांनी सभेत उपस्थित केला. जलसंधारणाची कामे करताना थेट रुंदीकरण खोलीकरण करता अभियंत्यांच्या ज्ञानाचा उपयोग करणे गरजेचे होते. सध्या करण्यात येत

बल्ब २५ हजारांचा, बिल तीन लाखांचे
ब्राह्मणवाडा थडी येथे हायमास्क बल्ब लावण्यासाठी तीन लाख रुपये मंजूर केले आहेत. परंतु, कंत्राटदाराने प्रत्यक्षात २५ हजार रुपयांचा बल्ब लावून बिल मात्र तीन लाख रुपयांचे काढले असल्याची तक्रार माझ्याकडे असल्याची बाब बबलू देशमुख यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीचे कामे झाल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी बैठकीत सभागृहात केली.