आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामायण विशारद परीक्षेत अरबाज देशात पहिला, श्रीरामचरित्रातून जीवनात सकारात्मक बदल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- प्रभू श्रीराम चरित्रातून जीवन जगण्याची सकारात्मक दृष्टी मिळते. त्यामुळे प्रत्येकाने जाती-धर्मांच्या पुढे जाऊन रामायण विशारद परीक्षा दिली पाहिजे, असे मत या परीक्षेत देशात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अरबाज  कुरेशी याने व्यक्त केले.  अरबाजचे वडील पप्पू कुरेशी हे एका कंपनीत वेल्डिंगचे काम करतात, तर आई गृहिणी आहे. 

अरबाज म्हणाला, माझ्या आईने मला रामायणावरील परीक्षा देण्यास प्रोत्साहन दिले. समोर राजपद चालून आलेले असताना पित्याच्या वचनपूर्तीसाठी रामाने वनवास स्वीकारला. राम अविचल राहिले.समितीतर्फे देशभरातील परीक्षा केंद्रांवर दरवर्षी रामायण कथेवर आधारित परीक्षा घेण्यात येते. या वर्षी सुमारे ४०० िवद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील सुमारे ३० विद्यार्थी मुस्लिम समाजाचे होते, अशी माहिती नागपूर येथील श्री तुलसी साहित्य प्रचार केंद्राचे किशोर शर्मा यांनी दिली. नागपूर येथील पोद्दारेश्वर राम मंदिरात हे केंद्र आहे. 
बातम्या आणखी आहेत...