आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुनगंटीवार-राणेंमध्ये नोटाबंदीवर खडाजंगी, विधान परिषद सभापतींच्या मध्यस्थीने वाद मिटला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नोटाबंदीवरून विधान परिषदेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यात खडाजंगी उडाली. त्यामुळे काही काळ थंडीतही सभागृहाचे वातावरण तापले होते.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मत मांडल्यानंतर नारायण राणे उभे राहिले. नोटाबंदीला ९४ टक्के लोकांचा पाठिंबा असल्याचे केंद्र सरकार दडपून सांगत आहे. प्रत्यक्षात लोकांत असंतोष आहे. आतापर्यंत नोटाबंदी केलेले ६ देश दिवाळखोरीत निघाले. अन्य विषयांवरील लक्ष विचलित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप राणेंनी केला.
बातम्या आणखी आहेत...