आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोभायात्रेत शेतकरी आत्महत्येचा देखावा सादर करताना गळफास; युवकाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- शोभायात्रेत शेतकरी आत्महत्येचा देखावा सादर करताना खरोखरच गळफास लागल्याने एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर ग्रामीणमधील रामटेक येथे गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेत मृत्यमुखी पडलेल्या युवकाचे नाव मनोज अरुण धुर्वे (वय २७) असे होते. तो जवळच्या नवरगाव येथील राहिवासी होता. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
 
शोभायात्रेतील ट्रॅक्टरवर चार ते पाच युवक दोरखंड बांधून त्यात मान अडकवून घेत होते. काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मनोजने मान दोरात अडकवल्यावर तो काहीवेळ तसाच बसून होता. हा प्रकार काहीसा उशिराने त्याच्या सहकाऱ्यांना लक्षात आला. मनोजच्या मानेतून दोर काढण्यात आल्यावर तो काहीच प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आले.
 
त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत जाहीर केले. मात्र, मनोजचा मृत्यू गळफास लागल्याने झाला नसावा, अशी शंका रामटेक पोलिसांनी व्यक्त केली आहे. मनोजची प्रकृती पूर्वीपासून बरी नव्हती. त्याला गळफास लागल्याचे वाटत नव्हते. वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाही. त्यातून मृत्यूचे नेमके कारण स्पस्ट होईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक योगेश पारधी यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...