आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कागदातून साकारली देखणी,विशाल प्रतिमा; थ्रीडी रचना पद्धतीचा खुबीने वापर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - तीन महिन्यांचे अथक परिश्रम, ८० किलो कागद, १० हजार ड्राॅईंग शिट्स तसेच रंगाचा वापर करता कोलाज, मोझ्याक त्रिमित रचना पद्धतीचा वापर करून फ्रेझरपुरा येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील कला शिक्षक आशिष देशमुख महेश अलोणे यांच्या मार्गदर्शनात गुणी विद्यार्थ्यांनी डाॅ. आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त ३० गुणीले २५ फुट आकाराचे विशाल चित्र तयार केले आहे. या चित्राची लिम्का इंडिया बुक आॅफ रेकाॅर्डसमध्ये नोंद व्हावी, असे प्रयत्न सुरू आहेत.
 
श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारे संचालीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात भारतरत्न डाॅ. आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून तयार करण्यात आलेल्या या चित्राचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दा.ग.चॅ.ट्रस्टच्या उपाध्यक्षा कीर्ती अर्जुन, मुख्य अतिथी म्हणून कोषाध्यक्ष राजेश अर्जुन, प्रशासकीय अधिकारी रोशनप्रकाश राव, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कुकडे उपस्थित होते.
 
या चित्राची संकल्पना कला शिक्षक आशिष देशमुख यांची असून त्यांनी विद्यालयात सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली. या मंडळातील सदस्य क्रीडा शिक्षक महेश अलोणे, विद्यार्थी चेतन नितनवरे, पवन मुधोळकर, हेमंत कैकलवार, अभिषेक देवकर, गौतम घोडेस्वार, अंशू पासरे, तेजस बोज्जे, तेजस गावंडे, तेजस राठोड, अमित सावळे, शीतल जामनिक, गंुजन बागडे, मोमीना लांगे, सिमरन बितरे, रविना अवटिक या विद्यार्थ्यांनी सतत परिश्रम घेत या चित्राची मांडणी केली. चित्रासाठी ड्राॅईंग शिट्स, वर्तमान पत्र, साड्या, दोरी, फेव्हीकाॅलचा वापर करण्यात आला. यात स्तुप, चक्र, संविधान शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोलाज चित्राची मांडणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशासाठी शिक्षक नीलेश देशमुख, प्रतिभा गवई, महेश अलोणे, हरिभाऊ कान्हेरकर, नरेंद्र जामदार, वीरेंद्र शिरभाते, पवन गावंडे, शिल्पा खोंड, अंजली सांगोले, रेखा तायडे, सोनाली वगारे, दीपक पारधी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नीलेश देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन शिल्पा खोंडे यांनी केले. यावेळी मोठी उपस्थिती होता.
 
वृत्तपत्रातीलरंग, बातम्यांचा कल्पकतेने वापर: दरवर्षी आयोजित चित्रकला परीक्षेला सुमारे १२ हजार विद्यार्थी बसतात त्यांच्या १० हजार ड्राॅईंग शिट्स या विशाल चित्रात वापरण्यात आल्या. स्तुप बाहेर दिसावा म्हणून कागदाचे गोळे तयार करून त्यावर कागद चिकटवला. नंतर त्यावर वर्तमानपत्र गुंडाळले. याद्वारे प्राचीन काळातील स्तुपाचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मुख्य संकल्पनाकार आशिष देशमुख महेश अलोणे यांनी दिली. यात रंगाचा वापर करण्याचे टाळण्यात आले. तीन महिने परिश्रम घेत वृत्तपत्रातील विविध रंगाच्या जाहिराती बातम्यांचा कल्पकपणे वापर या चित्रात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...