आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंजनगाव येथील अरुण जिनिंगच्या गाेदामाला आग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनगाव सुर्जी - येथील अरुण जिनिंग अँड प्रेसिंगच्या गोदामाला अचानक आग लागल्याने त्यामध्ये कापसाच्या जवळपास पंधराशे गाठी जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी (दि. ७) दुपारी वाजताच्या सुमारास घडली. बोराळा रोडवर अरुण जिनिंग अँड प्रेसिंगच्या गोदामात कापसाच्या गाठी ठेवण्यात आल्या होत्या. गोदामातून दुपारच्या सुमारास धूर येत असल्याची बाब काहींच्या लक्षात आली. आग लागल्याचे लक्षात येताच त्वरित अंजनगाव, परतवाडा, अकोट, दर्यापूर, मूर्तिजापूर येथील नगरपालिकांच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, चारही बाजूंनी गोडाउन बंद असून वरून टिनपत्रे असल्याने आग विझवण्यात अडचणी निर्माण होत होत्या. दरम्यान, आग विझवण्यासाठी जेसीबीच्या मदतीने गोदामाची भिंत पाडण्यात आली. तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते. यामध्ये असलेल्या जवळपास अंदाजे दोन कोटी रुपये किंमतीच्या १५०० गाठी जळून खाक झाल्याची माहिती जिनिंगचे माल प्रसन्न संगई यांनी दिली. हे गोदाम जिनिंगपासून काही अंतरावर असून आग तत्काळ आटोक्यात आल्याने मोठे नुकसान टळले. तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, पोलिस अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. वृत्त लिहिस्तोवर आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.
बातम्या आणखी आहेत...