आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टक्केवारीचा आरोप करणाऱ्यास भाजप आमदाराकडून मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - भाजपचे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम यांनी भाजपच्या सोशल मीडिया तालुका संयोजकाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. रूपेश टाक नामक या सोशल मीडिया संयोजकाकडून शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तोडसाम यांच्याशी संबंधीत एक पोस्ट व्हायरल करण्यात आली. व्हायरल झालेल्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, रूपेश टाकविरोधातच एका भारतीय जनता पक्षाच्या एका  कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले अाहे.   

रूपेश टाकने शुक्रवारी व्हॉट्सअॅपवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,‘मित्रांनो, आमदाराच्या मागे लागून वेळ व पैसा वाया घालवू नका, १० टक्के असेल तरच बोला. पक्षाचे काम फक्त करत राहा. धन्यवाद....बोगस आहे भाऊ. पोटतिडकीने बोलतो रूपेश टाक. सोशल मीडिया तालुका संयोजक भाजपा. माझे फक्त पद जाऊ शकते, ताकद नाही.’ ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रूपेश टाक यांना शुक्रवारी रात्री दाभाडी रोडवर मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंंतर आमदाराने आपल्याला मारहाण केली, अशी पोस्टही रूपेश टाक यांनी स्वत: व्हायरल केली. त्यामुळे ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले. 

दरम्यान, या पोस्ट व्हायरल होताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.  आर्णी येथील भाजपचे कार्यकर्ते निखिल ब्राह्मणकर यांनी आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहेे. या तक्रारीत रूपेश टाक हे सोशल मीडिया प्रमुख आहेत. त्यांनी आमदार राजू तोडसाम यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट व्हॉट्सअॅपवर टाकली. त्यासोबतच मोबाइलवरून शिवीगाळ करत धमकी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरून आर्णी ठाणेदार यांनी रूपेश टाक याच्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, आमदार तोडसाम ‘नॉट रिचेबल’...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...