अमरावती - शहरातील श्याम चौक परिसरातील जोशी मार्केटमध्ये (जे अॅन्ड डी मॉल) 'कल्पना' जनरल स्टोअर्सचे मालक मुकेश हरगुणदास घुंडीयाल (वय ३६) रा. दस्तुरनगर यांना मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी (दि. १३) रात्री नविन चोरडीया, पवन केशरवानी, सौरभ केशरवानी, सादीक गोरावाला आणि संतोष केसरवाणी या पाच जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. या घटनेवरून रात्री मार्केटमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. दुकानदाराला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज (दि. १४) दिवसभर मार्केट बंद ठेवण्यात आले. याचवेळी आरोपी गटाच्या तक्रारीवरून दुकानदाराच्या गटाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मुकेश घुंडीयाल यांचे जे अॅन्ड डी मॉलमध्ये कल्पना स्टोअर्स नावाचे प्रतिष्ठान आहे. बुधवारी (दि. १३) रात्री वाजताच्या सुमारास जे अॅन्ड डी मॉलवर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्तींनी मॉलमध्ये फिरून ज्या व्यापाऱ्याचे विक्रीचे साहित्य दुकानाबाहेर आहे, त्यांना आतमध्ये घेण्याबाबत सांगितले. मात्र त्यावेळी कल्पना स्टोअर्सचे संचालक मुकेश घुंडीयाल यांनी साहीत्य थोड्या वेळानंतर आत घेतो, आता ग्राहक आहे, असे म्हटले. यावरून घुंडीयाल आरोपींमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यात मुकेश घुंडीयाल यांच्या नाकाला जबर दुखापत झाली. या प्रकरणी मुकेश यांचे वडील हरगुणदास यांनी बुधवारी रात्री उशीरा शहर कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली. यावरून नवीन चोरडीया, पवन केशरवानी, सौरभ केशरवानी, सादीक गोरावाला आणि संतोष केसरवाणी या पाच जणांविरुद्ध किरकोळ मारहाण, दंगा मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दाखल केला होता. आरोपींना अटक करून आज त्यांची जामिनावर सुटका झाली. दरम्यान याचवेळी योगेश बद्रीप्रसाद केशरवानी यांनी पोलिसात व्यापाऱ्यांच्या गटाविरुध्द तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी मुकेश घुंडीयाल, हरगुणदास घुंडीयाल, राजू घुंडीयाल, राजेश मतानी, संजय मतानी, पीयूष घुंडीयाल आणि पंकज घुंडीयाल यांच्याविरुद्ध शिवीगाळ, धमकी जमाव केल्याबाबतचे गुन्हे दाखल उर्वरित.पान
जे अँड डी मॉलच्या बाहेर व्यापाऱ्यांकडून निषेधाचे असे फलक लावण्यात आले होते.