आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी जमिनीत गाडून घेतले, कार्यालयात साप सोडले, आता हात बांधून आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- आगळ्या वेगळ्या प्रसिद्ध असलेले अचलपूरचे अपक्ष आमदार बच्‍चू कडू यांनी सोमवारी हात बांधून विधान भवनात प्रवेश केला. अंपग पुन्रवसन कायदा करूनही अपंग बांधवाना प्रलबिंत
मागण्यांसाठी आजही रस्त्यावर उतरावे लागते. प्रशासनाला याचा जाब विचारला तर, थेट गुन्‍हे दाखल करून आवाज बंद केला जातो, असे म्‍हणत आमदार कडू यांनी शासनाचे लक्ष वेधण्‍याचा प्रयत्‍न केला.

शासनाला शेतक-यांचे दुःख कळावे म्हणून मी हा सत्याग्रहचा मार्ग स्विकारत आहे असे म्‍हणत, संपूर्ण अधिवेशनात जो पर्यत सरकार मागण्‍या मान्‍य करणार नाही तोपर्यंत मी हात बांधूनच कामकाजात भाग घेणार असल्‍याचे आमदार कडू यांनी माध्‍यमांना सांगितले. आमदार कडू यांचे हे अभिनव आंदोलन विधानभवनाच्‍या परिसरात चर्चेचा विषय ठरले. अंध, अपंग आणि शेतक-यांच्‍या मागण्‍यांसाठी आमदार बच्‍चू कडू यांनी राज्‍यभरात अनोखे आंदोलनं केले आहेत.
आंदोलनाचे अनोखे प्रकार
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्‍या काळात आमदार कडू यांनी केलेले ‘शोले’ स्‍टाईल आंदोलन प्रचंड गाजले होते. अंध अपंग व सर्वसामान्‍यांच्‍या प्रश्‍नांसाठी बैलगाडी मोर्चा, टेंभा मोर्चा, भीक मांगो आंदोलन, अपंग बेरोजगारांसाठीचे डेरा आंदोलन, कधी आपल्या समर्थकांसोबत स्वत:ला बसमध्ये कोंडून घेऊन, अधिका-याच्‍या खुर्चीला फुलमाळा चढवून, तर कधी थेट जिल्‍हाधिका-यांच्‍या दालनात आठ- दहा साप सोडून केलेल्‍या अनोख्‍या आंदोलनांमुळे आमदार बच्चू कडू नेहमी चर्चेत राहिले आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, आमदार बच्‍चू कडू यांच्‍या अनोख्‍या आंदोलनांचे फोटो..