आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम कार्ड बदलून 40 हजारांनी फसवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मागील चार दिवसांपासून शहरातील एटीएममध्ये ठणठणाट आहे. दस्तूरनगर भागातील एका एटीएमवर ६० वर्षीय गृहस्थ गेले. असता त्यांना पैसे मिळाले नाही, त्याचवेळी एक भामट्याने बॅलेन्स तपासून पहा, असा सल्ला देवून त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून दुसऱ्या ठिकाणाहून त्यांच्या खात्यातून ४० हजार हजार रुपये काढले.ही घटना रविवारी घडली असून सोमवारी (दि. १) अनोळखी भामट्याविरुध्द पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रदीप राजेंद्र भारती (६०, रा. न्यु भारतीय कॉलनी, छत्री तलाव मार्ग, अमरावती) असे फसगत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

भारती रविवारी दस्तूरनगर भागातील एका एटीएमवर गेले होते मात्र त्या ठिकाणी त्यांना पैसे मिळाले नाही म्हणून ते परत निघाले असता त्याच ठिकाणी एक अनोळखी युवक त्यांना म्हणाला बॅलेन्स तपासून पहा, त्यानेच भारती यांचे कार्ड घेवून बॅलेन्स तपासले कार्ड भारती यांना परत केले. काही वेळानंतर भारती यांच्या मोबाईलवर खात्यातून ४० हजार रुपये काढल्याचे दोन एसएमएस आले. तसेच १७ हजार ५०० रुपये वैभव दिलीपराव एल नामक व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सपर झाल्याचेही मॅसेजव्दारे कळले. त्यानंतर भारती यांनी त्या युवकाने दिलेले एटीएम कार्ड तपासले असता ते एटीएम कार्ड त्यांचे नसल्याचे लक्षात आले. त्या अनोळखी भामट्याने त्याच्याकडील एटीएम भारती यांना देवून भारतींचे एटीएम पळवून अदलाबदली केली. त्या कार्डव्दारेच त्याने खात्यातून रक्कमही काढली. फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 
 
बातम्या आणखी आहेत...