आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकलीवर अत्याचार; नराधमास १० वर्षांची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - तीनवर्षांपूर्वी वरूड तालुक्यातील एका गावात सहा वर्षांच्या चिमुकलीला खाऊ देण्याचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका २८ वर्षीय नराधमाला येथील अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश (क्रमांक ३) एस. एस. भिष्म यांच्या न्यायालयाने सोमवारी (दि. ११) १० वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.तसेच पीडीत चिमुकलीला ५० हजार रुपये नुकसान भरपाईचे आदेश दिले.
प्रफुल्ल रामभाऊ तसरे (२८) असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे. गावातच राहणारी एक वर्षीय चिमुकली २३ नोव्हेंबर २०१३ ला तिच्या मित्र मैत्रिणींसोबत मंदिरासमोर खेळत होती. याचवेळी प्रफुल्ल त्या ठिकाणी गेला. त्याने या चिमुकलीच्या मित्र मैत्रिणींना चिप्स पॉकेट बिस्किट खायला दिले. याचवेळी चिमुकलीला सोबत घेतले स्वत:च्या घरात आणले. दरवाजा बंद करून घरातील टिव्हीचा आवाज मोठा करून दिला. त्यानंतर या नराधामाने चिमुकलीवर अत्याचार केला. या प्रकारामुळे घाबरलेली चिमुकली रडतच घरी गेली. तिने झालेला प्रकार आईला सांगितला. त्यामुळे त्याच दिवशी चिमुकलीच्या आईने बेनोडा पोलिस ठाणे गाठून नराधम प्रफुल्ल तसरेविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी या नराधमाविरुद्ध अत्याचार, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम अॅट्रॉसिटी कायदाप्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली. सदर प्रकरणाचा तपास मोर्शीचे तत्कालीन एसडीपीओ सागर पाटील यांनी पूर्ण करून २४ जानेवारी २०१४ ला न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाकडून ११ साक्षीदार तपासण्यात आले. ११ पैकी तीन साक्षीदार हे बालसाक्षीदार होते. मात्र सर्व साक्षीदार आपल्या जबाबावर कायम राहिले आहे. तसेच डिएनए आणि सी. ए. (केमिकल अॅनालिसीस) अहवाल पॉझिटीव्ह असल्यामुळे या नराधमाने गैरकृत्य केल्याचे न्यायालयापुढे आले. दोष सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने नराधम प्रफुल्ल तसरेला उपरोक्त शिक्षा सुनावली. सहायक सरकारी वकील अॅड. शशिकिरण पलोड (आसोफा) यांनी युक्तिवाद केला आहे. याप्रकरणी डिएनए सी.ए. रिपोर्टमध्ये ‘फॉरेन्सिक लॅब’ची भूमिका अत्यंत मोलाची ठरली आहे.
बातम्या आणखी आहेत...