आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर चौघांचा अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अल्पवयीन मुलीवर एका अल्पवयीनासह चार नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना चिखलदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामध्ये बुधवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसर सुन्न झाला असून, अल्पवयीन आरोपीच या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.
संतोष भानू भुसूम (२१), मंगेश छोटेलाल कास्देकर (१९), प्रवीण मुंगीलाला भुसूम (१९) अशी आरोपींची नावे असून, अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, ३१ मेच्या मध्यरात्री चौघांनीही तिला घरातून उचलून परिसरातील एका शेतात नेऊन सामूहिक अत्याचार केला. यासंदर्भात पीडितेने मंगळवारी (दि. ७) पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले. तिघांना न्यायालयाने गुरुवारपर्यंत (दि. ९) पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनेचा तपास पीआय नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...