आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपसभापतीसह शिवर येथील पाच जणांवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे, गायरान जमिनीवरून हाणामारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर- गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्याच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या पंचायत समिती उपसभापती संजय देशमुख यांच्यासह पाच जणांवर पोलिसांनी गुरूवारी (दि. १८) अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल केले. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे शिवर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

तालुक्यातील शिवर गावाबाहेर चंद्रभागा नदीच्या काठावर असलेल्या गायरान जमिनीवर गावातील काही नागरिकांनी अतिक्रमण करून शेती केली आहे. त्यामुळे येथे गुरे चारणाऱ्यांना या नागरिकांकडून मनाई केली जात होती. दरम्यान, बुधवारी गुरे चारण्यासाठी जाणारे गुराखी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अतिक्रमण करणाऱ्या गटातील काही नागरिकांनी मिरची पुड फेकून लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला होता. यात संजय देशमुख,

खंडेराव पातुर्डे, संतोष चंदन जखमी झाले होते. दरम्यान, बुधवारी दुपारी मनोज देशमुख यांच्या तक्रारीवरून पुरूष महिलांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून रात्री अटक करण्यात आली. दरम्यान अतिक्रमण करणारे देविदास चव्हाण यांच्या तक्रारीवरून संजय देशमुख, खंडेराव पातुर्डे, संतोष चंदन, शिवा बयस, महेंद्र चौपगार, पंडीत देशमुख या पाच जणांवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

दोघांनाजामीन : गायरानजमीन मारहाण प्रकरणी बुधवारी अटक करण्यात आलेल्या पाच अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झालेल्यांपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. गुरूवारी दुपारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता पंजाब चौरपगार यांना २० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कांता पवार, वनमाला चौरपगार, शौभा चौरपगार, देविदास चव्हाण यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी तर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झालेल्या शिवा बैयस, महेंद्र चौरपगार यांना जामीन देण्यात आला.

पोलिस अधीक्षकांची भेट
शिवरयेथे दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास दर्यापूर येथे भेट दिली. ग्रामस्थ, राजकीय नेते, पत्रकारांची बैठक घेऊन मते जाणून घेतली. दरम्यान, याप्रकरणी अॅट्रॉसिटी अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत उपस्थितांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली.

कायदेशीर कारवाई करू
परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील जखमी व्यतिरिक्त काही आरोपींना घटनेच्या दिवशी अटक करण्यात आली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अभिजितशिवतारे, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी, दर्यापूर.
बातम्या आणखी आहेत...