आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Attack On Deputy Executive Officer Along With Encroachment Squad

अतिक्रमण हटवणाऱ्या पथकासह उपकार्यकारी अभियंत्यांवर हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रतवाडा येथे अतिक्रमण मोहीम राबवत असताना अतिक्रमणधारकांनी उपकार्यकारी अभियंता एस. एस. खान यांच्यावर असा हल्ला चढवला.
परतवाडा - शहरातील एलआयसी चौक ते अचलपूर मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटवणाऱ्या पथकासह उपकार्यकारी अभियंता एस. एस. खान यांच्यावर अतिक्रमणधारकांनी हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि. ६) सकाळी वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी शेकडो अतिक्रमणधारकांचा जमाव झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, अभियंता खान यांनी सुरू केलेल्या मोहिमेचे शहरात स्वागत होत असून, आता पालिका प्रशासन अतिक्रमणाविरुद्ध कधी मोहीम उघडणार, असा सवाल शहरवासीयांकडून विचारला जात आहे.

दैनिक दिव्य मराठीने शहरातील प्रमुख रस्त्यांवर झालेले अतिक्रमण पार्किंगच्या समस्येबाबतचे २५ डिसेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले होते. रस्त्यावरील अतिक्रमण पार्किंगच्या समस्येमुळे शहरात मागील चार वर्षांत गंभीर अपघात होऊन अनेक विद्यार्थ्यांचे जीव गेले. शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या व्यथा या वृत्तातून मांडण्यात आल्या होत्या. दिव्य मराठी च्या वृत्ताची दखल घेऊन परतवाडा येथील एलआयसी चौक ते अचलपूर मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावर झालेले अतिक्रमण आज सकाळी विभागाच्या वतीने हटवण्यात आले. या मार्गावर पानटपऱ्या, चहा टपऱ्या किरकोळ दुकानांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. यातील काही दुकानांमधून अवैध व्यवसायही फोफावला होता. या मार्गावर अतिक्रमणामुळे वाहतूक पार्किंगच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले होते. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने उपकार्यकारी अभियंता खान यांच्या नेतृत्वात जेसीबीने अतिक्रमण हटवण्यात आले. दरम्यान, अतिक्रमण मोहीम राबवण्यात येत असताना अतिक्रमणधारकांच्या जमावाने खान यांच्यासह पथकाला लाठ्याकाठ्या घेऊन धमकावणे सुरू केले हल्ला केला. या वेळी शेकडो जमाव घटनास्थळी गोळा झाला होता.

भेदभावपूर्ण कारवाई
शहरात होत असलेले अतिक्रमण समर्थनीय नाही. मात्र, एकतर्फी होणारी कारवाई योग्य नाही. बांधकाम विभागाने सूचना देऊन कारवाई केली असती, तर बेरोजगारांचे नुकसान झाले नसते. किशोर कासार, शिवसेना,शहरप्रमुख.

नागरी समस्यांकडे दुर्लक्ष
शहरातील समस्यांकडे पालिका प्रशासनाचे कोणतेच लक्ष नाही,याचे आश्चर्य वाटते. नागरी समस्येकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. डॉ. कमल अग्रवाल, नागरिक.

पालिका प्रशासन सुस्त
खुद्द पालकमंत्र्यांनी अतिक्रमण हटवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. परंतु, पालिका प्रशासनाने त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. अतिक्रमण होत असताना प्रशासन डोळे कसे मिटून घेते, हा प्रश्नच आहे. गजानन कोल्हे, भाजप,जिल्हा उपाध्यक्ष.

नियमानुसार केली कारवाई
हामार्गबांधकाम विभागाच्या हद्दीत असून, अतिक्रमण काढणे आवश्यक होते. ही कारवाई नियमाप्रमाणे करण्यात आली. मात्र, काही अतिक्रमणधारकांनी वाद उत्पन्न करीत हल्ला केला. एस. एस. खान, उपकार्यकारीअभियंता साबांवि.