आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आई-वडिलांसह पत्नीला भेटून औरंगाबादकडे कामावर परतणाऱ्या एकाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - दसरा सणानिमित्त आई-वडिलांसह पत्नीला भेटून औरंगाबादकडे नोकरीच्या ठिकाणी कामावर परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील वडोद कमान ते नायगव्हाणदरम्यान असलेल्या वळण रस्त्यावर मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. संजीव जगन्नाथ आगलावे (२८, वडशेद दानापूर, ता. भोकरदन) असे मृताचे नाव आहे. खुलताबाद तालुक्यातील घोडेगाव (गोळेगाव गदाना) येथून अद्रकाची पोते भरलेला टेम्पो ४०७ (एमएच २० अे ५९१०) हा भरधाव जात असताना औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील वडोदकमान ते नायगव्हाण दरम्यानच्या रस्त्यावरील वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीला (एम एच २० बी. के. ७३८४) धडक दिली. यात दुचाकीस्वार संजीव आगलावे हा गंभीर जखमी झाला. त्याला फुलंब्री उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. संजय आगलावे हा औरंगाबाद येथे खासगी गुत्तेदाराकडे कामगार होता.
बातम्या आणखी आहेत...