आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लॅस्टिकचा वापर टाळावा म्हणून देताहेत नि:शुल्क ताट, वाटी, प्याले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती : लग्नसमारंभ,वाढदिवस किंवा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असला की, पिण्याच्या पाण्यापासून ते जेवणाच्या पत्रावळीपर्यंत सर्वच वस्तू प्लास्टिकच्या वापरण्याची पद्धत रूढ झाली आहे. परंतु, प्लास्टिकच्या या अपरिमित वापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने एकात्मता सेवाभावी बहुउद्देशीय संस्था, गाडगेनगरने श्री संत गाडगेबाब पुण्यातिथी निमित्त स्वच्छता मोहीम पर्यावरण बचाव अंतर्गत कोणत्याही आयोजनासाठी नि:शुल्क ताट, वाटी, प्याले देण्याचा स्तुत्य समाजसेवी उपक्रम सुरू केला आहे. विशेष बाब अशी की, हा नियमितपणे सुरू राहणार आहे. 
 
मोठ्या समारंभामध्ये चहा, कॉफी, पिण्याचे पाणी, खाद्य पदार्थ घेण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिकचे ताट, वाटी ग्लाॅस यामुळे शहर गावाबाहेर प्लास्टिकचे ढिग लागलेले दिसतात. या प्लास्टिकचे जमिनीत विघटन होत नसल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. बरे वापरणारे या प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा योग्यप्रकारे विल्हेवाटही लावत नाहीत. प्लॅस्टिकमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होते, याची जाणीव असल्यामुळे एकात्मता सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेने प्लॅस्टिकचा वापर टाळून समारंभांमध्ये स्टीलचे ताट, वाटी, प्याले निशुल्क देण्यासाठी गाडगे बाबांच्या नावावर बिछायत केंद्राची स्थापना केली आहे. 
 
जुनंते सोनं या तत्त्वावर काम : सध्यामॉडर्न संस्कृतित पर्यावरणाचा ऱ्हास होईल, अशाच वस्तुंचा वापर वाढला आहे. केळीची पाने, पळस किंवा टेंभुर्णीच्या पानापासून तयार केल्या जाणाऱ्या पर्यावरणपुरक पत्रावळी द्रोण वापरणे बंद झाले आहे. त्याऐवजी स्वस्त पडतात म्हणून सर्रास प्लास्टिकचा वापर वाढला आहे. परंतु, शरीर पर्यावरणासाठी घातक असलेल्या या प्लास्टीकऐवजी स्टीलचे ताट, वाटी, प्यॉले सर्वांनी वापरावे पर्यावरण रक्षणाला हातभार लावावा हाच संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 
संस्थेने नि:शुल्क ताट, वाटी, प्याले देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. 

स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहोचावा : स्वच्छता मोहिमेचा संदेश घराघरात पोहोचला तर हीच खरी वैराग्यमूर्ती गाडगेबाबांसाठी आदरांजली ठरेल. त्यामुळे बिछायत केंद्रात ताट, वाटी, ग्लास या तीन वस्तू सेवा तत्त्वावर देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संस्थेचे सुधीर आसटकर, नितीन शिरस्कार, नरेंद्र गावंडे, सुरेश शाहू, अनिकेत बुंधाडे, अर्जुन कानतोडे, कौशिक अग्रवाल इतर कार्यकर्त्यांनी दिली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...