आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांविरुद्ध बच्चू कडूंचे ‘अन्नत्याग’, समाजिक कार्यकर्त्यांविरुद्धचे गुन्हे रद्द करण्याची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- समाजकार्य करण्यासाठी पुढे येणाऱ्या, आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून ग्रामीण पेालिस अधीक्षक काही पोलिस अधिकारीपदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करून आमदार बच्चू कडू त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. ४) अन्नत्याग आंदोलन केले.दरम्यान, समाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध लावलेले गुन्हे तडीपारीची दिलेली नोटीस तातडीने रद्द करावी, अशी मागणीही यावेळी आमदार कडू यांनी केली. विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन पार पडले.

सामाजिक कार्यकर्त्याला तडीपार करण्याची नोटीस नुकतीच ग्रामीण पोलिसांनी चांदूर बाजार येथे बजावली आहे. याूर्वीही अनेकदा आम्ही आंदोलनाचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत आमचे आंदोलन होऊ नये, असा प्रयत्न पोलिस अधीक्षक काही पोलिस अधिकाऱ्यांचा आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यात सर्रासपणे अवैध व्यवसाय सुरू आहेत, वरली मटका, अवैध जनावरांची वाहतूक, अवैध दारू विक्री तसेच गुटखा जिल्हाभर मिळतो. तसेच काळीपिवळीद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जाते, यासर्व अवैध व्यवसायामंधून चिरीमिरीचे प्रकारही घडत असल्याचा गंभीर आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. दरम्यान, आंदोलनाला बसलेल्या आमदार कडू यांची भेट देण्यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे गेले होते. त्यावेळी पोलिस अधीक्षकांवर कारवाई तसेच सामाजिक कार्यकर्त्याला दिलेली नोटीस मागे घेण्याची मागणी केली. यावेळी आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचविण्यात येईल तसेच कारवाई संदर्भात सुद्धा चर्चा करण्याचे आश्वासन पालकमंत्री पोटे यांनी आमदार कडू आंदोलनात सहभागी प्रहारच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिले. या आंदोलनामध्ये प्रहारचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू, जोगेंद्र मोहोड, रोशन देशमुख यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पोलिसांचीअतिदक्षता अन् वाहनचालकांना त्रास: आमदारबच्चू कडू यांचे आंदोलन होणार ही माहिती मिळाल्यावर शहर पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जाते. कारण दुपारी वाजता असलेल्या आंदोलनासाठी पोलिसांनी ११ वाजतापासूनच मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करून टाकला होता. चांदूर रेल्वे ते बसस्थानक या मुख्य मार्गावरील पोलिस आयुक्त कार्यालय ते मालटेकडी या मार्गावर सर्वसामान्य नागरिकांना सकाळी ११ वाजतापासून सांयकाळी वाजेपर्यंत परवानगीच नव्हती. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी मालटेकडीजवळ पोलिसांनी बॅरिकेट्सचे जाळे उभारले होते.

ज्ञानमाता हायस्कूलवर दलित पॅंथरचा धडकलेला मोर्चा
आमदार बच्चू कडू यांनी केलेले चिरीमिरीचे इतर आरोप पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी फेटाळून लावले आहे. आम्ही कोणत्याही आंदोलकावर हेतूपुरस्सरपणे कारवाई करत नाही, नियमात जी तरतूद आहे, त्याचप्रमाणे कारवाई झाली आहे. गुटखा पकडणे हे पोलिसांचे काम नाही असे असले तरी आम्ही मागील वर्षभरात १३ लाख रुपयांवर गुटखा जप्त केला. तसेच मागील वर्षभरात गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांना पकडून ७१२ बैलांची ४० गाईंची सुटका केली. जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कायदा मोडणाऱ्यांविरुद्ध आम्हाला कारवाई करावीच लागते. याचवेळी पोलिसांकडून कुणाला मारहाण झाली असेल तर आम्ही त्या बाबीचे समर्थन करणार नाही. चांदूर बाजार येथील मारहाण प्रकरणाची अप्पर पालिस अधीक्षकांकडून चौकशी करण्यात येत असल्याचे लखमी गौतम यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...