आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेटवरच रंगला 'बॅड' मिंटनचा खेळ, अाज विभागीय आयुक्तांची घेणार भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागीलकाही िदवसांपासून या त्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या विभागीय क्रीडा संकुलात बुधवारी (दि.२६) हौशी बॅडमिटनपटूंना मागील दोन महिन्यांपासूनचे थकीत सराव शुल्क भरण्यासाठी पहाटे वाजताच्या सुमारास क्रीडा उपसंचालकांनी गेटवरच अडवून खेळण्यास मज्जाव केला. सकाळी खेळून िदवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी आलेल्या २५ ते ३० हौशी खेळाडूंची आजची सुरुवात क्रीडा संकुलात अतिरिक्त शुल्काच्या 'बॅड'मिंटनने झाली.परिणामी खेळाडूंची पहाटच वादावादीत हमरीतुमरीने गेली.सुमारे तासभर चाललेल्या 'बॅड'मिंटनच्या या 'खेळा'मुळे वादग्रस्त ठरलेल्या क्रीडा संकुलाच्या आगीत एकप्रकारे तेल पडले.

शहरातील एकमेव असलेले विभागीय क्रीडा संकुल मागील सहा महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. येथील क्रीडा संकुलात दररोज सकाळी मोठ्या प्रमाणात हौशी बॅडमिंटनपटू तर सायंकाळी विद्यार्थी खेळण्यासाठी येत असतात. बॅडमिंटन खेळण्यासाठी विद्यार्थ्यांना दरमहा १२०० रुपये तर सकाळच्या हौशी खेळाडूंना १३०० रुपये आकारण्यात येतात. दरम्यान, विजेचे बिल प्रचंड वाढल्यामुळे हौशी खेळांडूवर शंभर रुपये जादा आकारण्याचा निर्णय संकुल समितीने घेतला होता. परंतु हौशी खेळांडूकडे मागील दोन महिन्यांपासून वाढीव शुल्क थकीत आहे. त्यामुळे क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी काही दिवसांपासून हौशी खेळाडूंना शुल्क भरण्याची मागणी केली आहे. परंतु वकील, डॉक्टर, शासकीय अधिकारी, अभियंते आदींनी वाढीव शुल्क देण्यास नकार दिला आहे. दोन महिने उलटूनही हा तिढा सुटल्याने संबंधित प्रकरण विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास दररोजच्या प्रमाणे हौशी खेळाडू खेळण्यासाठी संकुलात दाखल झाले. परंतु प्रतिभा देशमुख यांनी आधी शुल्क नंतर खेळा अशी भूमिका घेतली. त्यामुळे भल्या पहाटेच हौशी खेळाडू क्रीडा उपसंचालक यांच्यात वादावादी होऊन चांगलीच हमरीतुमरी झाली. दरम्यान सकाळी जिल्हा स्टेिडयमवर फिरण्यासाठी आलेले माजी महापौर विलास इंगोले यांना या प्रकरणाची माहिती िमळाली. त्यांनी मध्यस्थी करून खेळाडूंनी आत जाऊन खेळावे, असे सांगितले. त्यावर हौशी खेळाडूंनी हे असे रोजचेच आहे. तुम्ही रोज येणार काय, असा प्रश्न इंगोले यांना केला. त्यानंतर पुन्हा शाब्दीक चकमक उडाली. पुन्हा इंगोले यांनी मध्यस्थी करीत खेळाडूंना समजावले. त्यानंतर खेळ सुरू झाला. या प्रकरणावर अद्याप समाधानकारक तोडगा निघाल्याने हौशी बॅडमिंटनपटूंचे प्रतिनिधी आणि माजी महापौर विलास इंगोले हे गुरुवारी (दि. २७) विभागीय आयुक्तांची भेट घेणार आहेत. दरम्यान संकुलात सुविधा मिळत नसल्यामुळे वाढीव शुल्क भरणार नाही अशी भूमिका हौशी खेळाडूंनी घेतली. दोन्ही पक्ष माघार घेण्यास तयार नसल्यामुळे वाद चांगलाच चिघळला होता. विभागीय क्रीडा संकुलात सात बॅडमिंटन कोर्ट आहेत. एका कोर्टवर सहा खेळाडू सराव करतात. त्यांना िदवसाला प्रत्येकी २५० रु. शुल्क द्यावे लागते. त्यातच कोर्ट सोमवारी बंद असते. येथे जनरेटर, वातानुकीलीत सिस्टीम, स्वच्छता, पिण्याचे पाणी, लाॅकर अशा कोणत्याही सुविधा नाहीत. लाईटही नियमित उपलब्ध नसते असे खेळाडूंचे म्हणणे आहे. आधी १२० लाईट्स होते. आता केवळ ३६ लाईट्समध्येच खेळावे लागते. त्यामुळे आपोआपच वीज बिल कमी झाले आहे. आधी चार कोर्ट होते. त्यावर खेळण्याचे हजार रुपये शुल्क घेतले जायचे. आता नियमाच्या बाहेर जाऊन शुल्क हजार रुपये करण्यात आले. आम्ही परवडत नसल्याची तक्रार केल्यानंतर ६५०० रुपये शुल्क करण्यात आले. येथे खेळण्याशिवाय कोणतीही सुविधा नाही, अशी तक्रार हौशी खेळाडूंनी यावेळी केली.

क्रीडासंकुलात केवळ बॅडमिंटन: शासनानेसर्वसामान्य खेळाडूंसाठी मल्टीपर्पज विभागीय क्रीडा संकुल उभारण्यासाठी िनधी िदला. या संकुलात बॅडमिंटन, बास्केटबाॅल, स्क्वॅश, नेमबाजी, ज्युदो, करटे या क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाऊ शकते. परंतु, सध्या येथे केवळ बॅडमिंटनच सुरू आहे. इतर खेळांना क्रीडा संकुलात मज्जाव आहे. १० मी. शुटींग रेंज असतानाही येथे नियमित सराव होत नाही. गत सहा महिनेपूर्वीपर्यंत ही स्थिती नव्हती.

क्रीडा उपसंचालक बदलले अन् वाद सुरू झाला, असे येथे हौशी खेळाडूंचे म्हणणे आहे. सुमारे २.५ लाख रुपये विजेचे बिल येत असल्यामुळे त्याचा भरणा करण्यासाठी खर्च कमी करून शुल्क वाढवावे लागल्याचे उपसंचालक प्रतिभा देशमुख यांचे म्हणणे आहे.

लोकप्रतिनिधिंकडूनमदत शक्य : गतसहा महिन्यांपासून विभागीय क्रीडा संकुलातील बॅडमिंटनपटूंचा वाद क्रीडा उपसंचालक कार्यालयासोबत चिघळत आहे. यासंदर्भात बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर हौशी बॅडमिंटनपटूंच्या झालेल्या चर्चेत स्टेेिडयमभोवती जे दुकानांचे गाळे आहेत, त्यांच्याकडून येणारे पैसे कुठे जातात असा प्रश्न उपस्थित झाला.

हौशी बॅडमिंटनपटंूनी संकुलाच्या जागेत उभ्या दुकानांच्या भाड्याबाबत उपसंचालक कार्यालयातील लेखापालांना विचारणा केली तेव्हा ते गडबडल्याचे दिसून आले.
मॅडमची भाषा बरोबर नाही

^सध्यामी७२ वर्षांचा आहे. गत ५० वर्षांपासून बॅडमिंटन खेळतो. या वयातही बोलणे ऐकावे लागते. मॅडमची भाषा बरोबर नाही. आम्हाला सर्व सोयींसह केवळ खेळण्याचा आनंद घ्यायचा आहे. वल्लभहेडा, हौशी बॅडमिंटनपटू, अमरावती.

अन्यथा कोर्टच बंद होईल
^व्यावसायिकलोकयेथे सरावासाठी येतात. आम्ही विद्यार्थ्यांकडूनही बाराशे रुपये शुल्क घेतो. हौशी खेळाडूंना शंभर रुपये जास्त मागितले तर ते भरायला नको काय? अन्यथा बॅडमिंटन कोर्टच बंद होईल. िकरणगित्ते, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा परिषद

वातावरण पवित्र ठेवा
^क्रीडाक्षेत्रातीलवातावरण पवित्र ठेवा. संवाद साधून प्रश्न सोडवा. कोणाच्याही विरोधात पत्र देऊ नका त्यामुळे भावना दुखावतात. खेळाडूंना खेळता यावे, असा प्रयत्न करण्यासाठी येथे आलो. विलासइंगोले, माजी महापौर खेळाडू.

समितीचा िनर्णय मान्य करायला हवा
^विभागीयक्रीडासंकुल समितीने बॅडमिंटन कोर्टवर खेळण्यासाठी वाढीव शुल्क आकारण्याचा िनर्णय घेतला तो खेळाडूंनी मान्य करायला हवा. अद्याप त्यांनी दोन महिन्यांचे १० हजार रुपये शुल्क भरले नाही. अशात संकुलाच्या रखरखावासाठी पैसा आणायचा कुठून? प्रतिभादेशमुख, क्रीडा उपसंचालक, अमरावती विभाग.
बातम्या आणखी आहेत...