आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन लाख रुपये रोख असलेली बॅग लांबवली, बसस्टँड चौकातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - तब्बल तीन लाख रूपये ठेवून असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबविली. ही घटना मंगळवार, दि. 5 सप्टेंबर रोजी स्थानिक बसस्थानक चौकात घडली. या प्रकरणी सेवानिवृत्त डेप्यूटी इंजिनिअर मिलींद कुळकर्णी, रा. मैथीली नगर यांनी वडगाव रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मैथिली नगरातील सेवानिवृत्त अभियंता मिलींद कुलकर्णी हे दत्त चौकातील अर्बन बँकेत मंगळवारी दुपारच्या सुमारास पैसे विड्रॉल करण्यासाठी आले होते. दरम्यान, बँकेतून त्यांनी तीन लाख ३० हजार रूपये विड्रॉल केले. यातील ३० हजार रूपये त्यांनी पँटच्या खिशात ठेवले, तर उर्वरीत तीन लाख रूपये एका बॅगमध्ये ठेवून ती बॅग गाडीला लटकवून ठेवली होती. दरम्यान, बँकेतून बाहेर आल्यानंतर ते घराच्या दिशेने निघाले, परंतु सिग्नलवर काहीवेळासाठी थांबून पूढे गेल्यानंतर गाडीला लटकवून ठेवलेली तीन लाख रूपयांची बॅग लंपास झाली होती. 
 
तद्नंतर त्यांनी लगेच शोधाशोध घेतला असता, कुठेही मिळू शकली नाही. शेवटी मिलींद कुळकर्णी यांनी वडगाव रोड पोलिस ठाणे गाठून अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. यावेळी बॅगमध्ये स्टेट बँकेच्या शाखेचे पासबुक, एक चेकबुक, आयडीबीआय बँकेचे पासबूक, आणि चेकबूक, आणि अर्बन बँकेचे पासबूक आणि चेकबुक, पॅनकार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड आदीच्या झेरॉक्सच्या प्रती होत्या.
 
शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये मागील काही दिवसामध्ये वाढ झाली आहे. विशेषत: बँकेच्या परिसरामध्ये चोरट्यांचा वावर असल्याचे दिसून आले आहे. चोरटे बँकेतून पैसे काढणाऱ्या ग्राहकाकडे विशेष लक्ष देऊन त्याच्याकडील पैसे लंपास करण्याचा प्रयत्न करतात असे आढळून आले आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...