आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ban On Liqor Sell In Plastic Bottles From 1st April

प्लास्टिकच्या बाटल्यांमधून मद्यविक्रीस बंदी, एक एप्रिलपासून पर्यावरणाची हानी टळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - प्लास्टिकपासून होणारे पर्यावरणाचे प्रदूषण रोखण्याकरिता यापुढे फक्त काचेच्या बाटल्यांमधूनच मद्यविक्री करण्याचे अादेश राज्य सरकारने काढले अाहेत. एक एप्रिलपासून प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये मद्यविक्रीस बंदी घालण्यात अाली अाहे.
पॉलिइथिलीन टेट्राप्थलेट म्हणजेच पेट आणि टेट्रा पॅकचा उपयोग करून प्लास्टिकच्या बाटल्यांची निर्मिती करण्यात येते. या बाटल्यांचा उपयोग मद्यविक्रीकरिता करण्यात येतो. ताे अाता करता येणार नाही. राज्यातील देशी आणि विदेशी मद्य निर्मिती करणाऱ्यांना पेट आणि टेट्रा पॅकचा वापर करण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. मात्र, यासंदर्भात काही संघटनांनी सरकारकडे आक्षेप नोंदवले होते.
पेट (प्लास्टिक) बॉटलकरिता वापरण्यात येणारा पदार्थ पर्यावरणास घातक आहे, याबाबत काही स्वयंसेवी संघटनांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. पेट बॉटल अविघटनशील असल्याने पर्यावरणाची हानी हाेते. पेट बॉटल्स वापरल्यानंतर त्यांची विल्हेवाट सहजासहजी लावता येत नाही आणि गटारे, नाले, मलनिस्सारण केंद्र इत्यादी व्यवस्थेमध्ये या बाटल्या पडल्या की सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. त्याचप्रमाणे प्लास्टिकचे घटक अल्कोहोलमध्ये काही प्रमाणात मिसळत असल्याने ते अाराेग्यास अपायकारक ठरू शकतात. या कारणामुळे अशा बाटल्यांवर बंदी घालण्यात अाली अाहे. काचेच्या बाटलीवर ‘फक्त महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता’ असे इंग्रजी आणि मराठीत लिहिणेही सक्तीचे असेल.