आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RSS वर का होती बंदी ? दहशतवादी संघटना घोषित करण्‍यासाठी अमेरिकेत याचिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - संघाच्‍या मुख्यालयात उद्या (गुरुवार) संघाचा 91 वा वर्धापण दिन साजरा केला जाणार. त्‍या अनुषंगाने स्‍वयंसेवक भव्‍य पथसंचलन करतील. मात्र, स्‍थापनेपासूनच संघावर कायम टीका होत आली. संघ मुस्‍लीम, ख्रिश्‍चन विरोधी आहे. या संघटनेला पुन्‍हा चार्तुवर्ण व्‍यवस्‍था आणायची असून, संघ दंगली घडवून आणतो, असा आरोप संघावर कायम होत आले. त्‍यातूनच संघावर बंदी आणण्‍याची मागणी संघ विरोधकांकडून केली जाते. त्‍या अनुषंगाने संघावर कधी बंदी होती याची खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
नागपूरमध्‍ये झाली स्‍थापना
डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी 27 सप्टेंबर 1925 रोजी दस-याच्‍या मुर्हतावर त्यांच्या 'शुक्रवारी' परिसरातील नागपूर येथील निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आजही संघाचे मुख्‍यालय नागपूर येथेच आहे.
संघाला विदेशी अतिरिकी घोषित करा : अमेरिकेत मागणी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) विदेशी अतिरेकी संघटना घोषित करावी, अशी मागणी करणारी याचिका अमेरिकेतील दक्षिण न्यूयॉर्क जिल्ह्यातील संघीय न्यायालयात सिख फॉर जस्टीस संघटनेने (SFJ) याच वर्षी जानेवारीमध्‍ये दाखल केली. न्‍यायालयाने यावर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांना समन्स बजावून उत्तर मागितले होते. दरम्‍यान, संघटनेने एप्रिल महिन्‍यात पुन्‍हा नव्‍याने याचिका दाखल केली. शिखांचे जबरस्‍ती धर्मांतर करण्‍याचा आरोप आरएसएसवर ठेवण्‍यात आला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, भारतात संघावर कधी आणि का घातली बंदी...