आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाधार कार्डधारक विद्यार्थ्यांच्या संख्येवरच अाश्रमशाळांना अनुदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यातील सर्वच अनुदानित अाश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना अाधार कार्डची सक्ती करण्यात अाली अाहे. त्यानुसार चालू शैक्षणिक वर्षापासूनच अाधार कार्डधारक विद्यार्थ्यांच्या संख्येनुसारच या शाळांना अनुदान देण्यात येर्इल, अशी माहिती अादिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
जळगाव व वाशीम जिल्ह्यातील अादिवासी अाश्रमशाळांमध्ये बाेगस विद्यार्थी भरती करून अनुदान लाटण्यात अाल्यची लक्षवेधी अामदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केली हाेती. उत्तरात सावरा म्हणाले, ‘जळगाव जिल्ह्यातील अाश्रमशाळांची तपासणी करण्यात अाली. मात्र, सुट्या असल्यामुळे मुले घरी गेली हाेती. त्यामुळे पथकाला मुले दिसली नाहीत, असे ते म्हणाले.

त्यामुळे पथकाला हे विद्यार्थी शाळेत दिसून अाले नाहीत, असा खुलासा बहुतांश शाळांनी पाठवला अाहे. तरीही त्याबाबत खातरजमा करण्यासाठी या शाळांची पुन्हा तपासणी करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...