शेगाव - मनाला प्रसन्न करणारे हे दृष्य आहेत श्री गजानन महाराज संस्थानच्या आनंद सागर या आध्यात्मिक पर्यटन केंद्रातील. देशातील प्रेक्षणीय पर्यटन स्थळांपैकी आनंद सागर एक आहे. येथील भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही निःशुल्क तर, काही अल्पदरातील सेवांमुळे शेगावला बारोमास भाविकांची गर्दी पाहायला मिळते. आज श्री गजानन महाराज पुण्यतिथी उत्सव, त्यानिमित्त्ा शेगावात भाविकांनी गर्दी केली आहे. भाविक आनंद सागरलाही भेट देतात. divyamarathi.com च्या या संग्रहात पाहूया आनंद सागरमधील काही खास फोटो..
भाविकांसाठी आहेत या सुविधा..
- मंदिर व शेगाव रेल्वे स्टेशनपासून आनंद सागरला जाण्यासाठी संस्थानची विनामुल्य बससेवा भाविकांसाठी आहे.
- आनंद सागर परिसरात संत गजानन महाराज संस्थानने भक्तांसाठी निवास व भोजनाची स्वस्त दरात सोय केली आहे.
- संत गजानन महाराज मंदिराप्रमाणे आनंदसागरमध्येही शेकडो सेवाधारी भाविकांसाठी कार्यरत आहेत.
- आनंद सागरचा विस्तार हा सुमारे 325 एकर जागेवर आहे.
- शेगाव-बाळापूर रस्त्यावर, शेगांवपासून सुमारे 2.5 km अंतरावर आनंद सागर आहे.
- खासगी ऑटो किंवा टांग्यांनेही पर्यटक आनंद सागरपर्यंत प्रवास करतात.
आनंद सागरमध्ये काय आहे..
फुलां फळांनी सजलेले बागबगिचे, आनंद सागर तलाव, झुला, विवेकानंद ध्यान केंद्र, मत्स्यालयात विविध प्रजातीचे मासे, लहान मुले व मोठ्यांसाठी खेळणी, आगगाडी, संगीतमय कारंजे, महापुरूषांच्या सुंदर मुर्ती, आकर्षक प्रवेशव्दार, उपहार गृह व फराळाची केंद्रे अशा विविध सेवा सुविधा आनंद सागरमध्ये आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, आनंद सागरमधील सुंदर फोटो....