आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीत ‘भारत विकास’चे कार्यालय जळून खाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - स्थानिक यशोदा नगरजवळील शांतीनगरात रविवारी रात्री साडेसात वाजता लागलेल्या भीषण आगीत रुग्णवाहिका सेवा पुरवणारे भारत विकास ग्रुपचे कार्यालय जळून खाक झाले आहे. 

 

शांती नगरातील सुजीत मिश्रा यांचे घर भारत विकास ग्रुप या रुग्णवाहिकेची सेवा देणाऱ्या संस्थेला भाड्याने दिले आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने घटनेच्या वेळेस कार्यालयात कोणीच नव्हते. बाहेरून बंद असलेल्या इमारतीत आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाने तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. इमारत बाहेरून बंद असल्याने आगीचा भडका उडाला होता. यामध्ये रुग्णवाहिकेचे नवीन टायर, संगणक, फर्निचर, अालमारी, प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांचे मूळ कागदपत्रे जळून खाक झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या कार्यालयामार्फत रुग्णवाहिकेवर सेवा देणाऱ्या डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाते. सद्या १५ डॉक्टरांचे १४ दिवसांचे प्रशिक्षण सुरू होते. डॉक्टर बाहेर गावचे असल्याने निवासी स्वरूपात प्रशिक्षण घेत होते. यातील काही डॉक्टरांचे मूळ कागदपत्र, साहित्य जळाले. अग्निशमन विभाग प्रमुख भारतसिंह चव्हाण यांच्या नेतृत्वात उपअधिकारी सै. अन्वर, फायरमन प्रेमानंद सोनकांबळे, विलास उमेकर, निखिल गाठे, अमित ददगाळ, अतुल कपले, योगेश ठाकरे, राजेश गजबे, वाहन चालक नसीब खान, नीलेश देवकर, इमदाद खान, नितीन इंगोले यांनी आग विझवली. 

बातम्या आणखी आहेत...