आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलेश, सूजय, लव्ह यांच्या अचूक अन् देखण्या योगमुद्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - भारतीय विद्यालय अमरावतीच्या दिलेस भोसले, सूजय मेश्राम, लव पवार दीपेश भोसले यांनी अचूक योगासने सादर करून जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत मुलांच्या १४ वर्षांखालील गटात अनुक्रमे प्रथम चार क्रमांकावर ताबा िमळवून विभागीय स्पर्धेसाठी पात्रता िमळवली. हरिकिसन मालू इंटरनॅशनल स्कूलच्या जितेश खरेने पाचवा क्रमांक पटकावला.

ऱ्हीदमिक प्रकारात महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाच्या अभिषेक लव्हाळेने प्रथम तर आर्टिस्टिक प्रकारात याच विद्यालयाच्या अनिकेत सावरकरने अव्वल स्थान बळकावले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने पं.जवाहरलाल नेहरू जिल्हा स्टेिडयमच्या सभागृहात झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या १४ वर्षांखालील गटात स्कूल आॅफ स्काॅलर्सच्या िनर्वाणी लभाणेने प्रथम तर ितची सहकारी रुद्रशी राठोडने द्वितीय क्रमांक पटकावला. गणेशदास राठी विद्यालय अमरावतीच्या वैष्णवी जाधवने ितसरे तर स्कूल आॅफ स्काॅलर्सच्या संस्कृती ढवळेने चौथे स्थान िमळवले. रामकृष्ण आश्रम शाळेच्या भाग्यश्री कासटकरने पाचवे स्थान िमळवले. ऱ्हीदमिक प्रकारात स्कूल आॅफ स्काॅलर्सच्या आस्वी जयपुरियाने बाजी मारली.

मुलांच्या १७ वर्षांखालील गटात एसओएससच्या चारही खेळाडूंनी पहिली चार स्थाने बळकावली. प्रतीक ठाकरेने पहिला, राम ठाकरेने दुसरा, यश खडकेने ितसरा, श्रेयस साळवेने चौथा क्रमांक पटकावला. रामकृष्णच्या संजीत भोगेने पाचवे तर नेहा दारसिंबेने प्रथम, गणेशदास राठी विद्यालयाच्या वेदांती जाधवने दुसरा, एसओएसच्या श्रृती सोळंकेने ितसरा क्रमांक मिळवला.
बातम्या आणखी आहेत...