आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

HBD भाऊसाहेब: गोपीनाथरावांना मित्रच नाही तर, भाऊ मानत फुंडकर, पाहा दुर्मिळ PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगांव, बुलढाणा- भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते आणि कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर उपाख्‍य भाऊसाहेब यांचा आज वाढदिवस. बुलढाणा जिल्‍ह्यातील नांदूरा तालुक्‍यात असलेल्‍या नारखेड या लहानशा गावात एका शेतकरी कुटुंबात 21 ऑगस्ट 1950 रोजी भाऊसाहेबांचा जन्‍म झाला. जनसंघ ते भाजप असा भाऊसाहेबांचा प्रवास राहिला असून, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अत्‍यंत प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची पाळेमुळे बळकट करण्‍यासाठी त्‍यांनी दिलेले योगदान महत्‍त्‍वपूर्ण आहे. आज भाऊसाहेब फुंडकर यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त divyamarathi.com च्‍या या संग्रहात जाणून घेऊया त्‍यांच्‍या राजकीय कारकिर्दीविषयी या खास बाबी.
कापूस प्रश्‍नावर काढली होती 350 KM पदयात्रा..
1983 मध्‍ये कापसाला भाव मिळावा यासाठी भाऊसाहेब फुंडकर यांनी 'खामगाव ते आमगाव' अशी तब्‍बल 350 किलोमीटर पदयात्रा काढली होती. आणीबाणीनंतर तळागाळातील सहकार्‍यांच्या साथीने त्‍यांनी पक्ष बळकट केला. 1971 च्‍या दरम्‍यान भाऊसाहेबांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकीय जीवनाची सुरुवात केली.
1972 मध्‍ये विद्यार्थी प्रतिनिधी..
1972 मध्‍ये नागपूर विद्यापीठात खामगावमधून विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भाऊसाहेबांची सर्वप्रथम निवड झाली. ही त्‍यांची पहिलीच निवडणूक होती. पुढे आणीबाणीत कारावास भोगल्यानंतर खामगाव विधानसभा मतदारसंघाचे 2 वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले. वसंतराव भागवत संघटन मंत्री असताना त्‍यांच्या मार्गदर्शनात भाऊसाहेबांनी 'खामगाव ते आमगाव' अशी पदयात्रा काढली. अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळविण्याचे श्रेय भाऊसाहेबांना जाते. सलग तीन वेळा त्‍यांनी अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात ठेवला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही भाऊसाहेबांनी सभागृहात आपला ठसा उमटविला.
गोपीनाथरावांसोबत घनिष्‍ठ मैत्री..
भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांचे निधन म्‍हणजे फुंडकर कुटुंबियांना मोठा धक्‍काच होता. भाऊसाहेब आणि गोपीनाथराव यांची तीस वर्षांपासून घनिष्‍ठ मैत्री होती. परस्‍परांमध्‍ये कुटुंबासारखे संबंध होते. गोपीनाथरावही भाऊसाहेबांच्‍या घरी येत असत. या जोडीने राज्‍यभर फिरून पक्षवाढीसाठी प्रयत्‍न केले. अठरा पगड जातींना त्‍यांनी पक्षात अाणले. भाऊसाहेब गोपीनाथरावांना मित्रच नव्‍हे तर, भावाप्रमाणे मानत होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, भाऊसाहेबांचे काही दुर्मिळ आणि कौटुंबिक फोटो..
बातम्या आणखी आहेत...