आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

241 वर्षांपूर्वी राजघराण्‍यात झाले युध्‍द, भावाने भावाचा काढला काटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराज रघुजी पहिले. - Divya Marathi
महाराज रघुजी पहिले.
नागपूर - मराठा साम्राज्याच्या काळात नागपूरची भूमिका महत्त्वाची होती. नागपूरच्या गादीसाठी अनेक युध्‍द झाली. यात पाचगाव युध्‍दाला विशेष महत्त्व आहे. हे युध्‍द भोसले राजघराण्‍यातील अंतर्गत युध्‍द आहे. ते 26 जानेवारी 1774 रोजी पाचगाव मैदानावर झाले होते.
हजारोंच्या संख्‍येत सैन्य...
- पाचगावच्या मैदानात भोसले राजघराण्‍याचे संस्थापक रघुजी भोसलेंच्या मुलांचे सैन्य आपापसात भिडले.
- यात युध्‍दात एक भाऊ मारला गेला आणि दुस-याच्या हातात राज्य आले.
- 241 वर्षांत प्रथमच या युध्‍दात दोन्ही गटांकडून हजारोंच्या संख्‍येत सैनिकांमध्‍ये युध्‍द झाले.
- तोफ, बंदूक, तलवार, बाण, भाले, हात्ती, घोडे आदींनी सज्ज सैन्य एकमेंकांचे रक्त प्यायला उतावळे होते.
मुधोजी विजयी झाले :
नागपूरचे इतिहासकार आणि मॉरिस महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे माजी प्रमुख डॉ.बी. आर. अंधारे यांनी आपल्या पुस्तकांत पाचगाव युध्‍दाचे विस्तृत उल्लेख केला आहे. यात त्यांनी सांगितले आहे, की पाचगाव युध्‍दात एक पिता अर्थात रघुजी पहिले यांच्या दोन मुलांमध्‍ये राज सिंहासनासाठी युध्‍द झाले होते. युध्‍दात नागपूरचे शासक जानोजींची हत्या त्यांचा उत्तराधिकारी रघुजी दुसराचा पिता मुधोजीने बंदूकीच्या गोळीने केली होती. या युध्‍दात मुधोजी विजयी झाले.
राजघराण्‍यातील अंतर्गत वादातून युध्‍द :
राज्य कारभाराची सूत्रे मुधोजीच्या हातात आली होती. भले सिंहासनावर मुधोजीचा मुलगा रघुजी द्वितीय असेल. मात्र कमी वय असल्याने राज्य कारभाराची आणि शासनावरील नियंत्रण मुधोजी यांचा होता. असे सांगितले जाते, की पाचगाव युध्‍द हे भोसले राजघराण्‍यातील अंतर्गत कलहाचे युध्‍द होते. नंतर मुधोजीने जानोजीला आपल्या गटात सामील करुन घेतले होते. यामुळे पुढे कोणताही विद्रोह झाला नाही. मुधोजीने इंग्रजांबरोबर हात मिळवले. ही साथ रघुजी दुसराच्या कालखंडापर्यंत चालू होते.
पुढील स्लाइड्सवर वाचा पाचगाव युध्‍दाविषयी...