आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘बीएचआर’च्या १३ संचालकांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सव्वादोन वर्षांपूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्था स्थापन करून शहरातील गुंतवण्ूकदारांची तब्बल १५ कोटी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या बीएचआरच्या संस्थापक, अध्यक्षासह तेरा जणांना सीआयडीने गुरूवारी (दि. ६) रात्री जळगावातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. दरम्यान, राज्यात वेगवेगळ्या शहरात बीएचआरविरुद्ध तब्बल ५७ गुन्हे दाखल आहेत. गुंतवलेल्या ठेवींवर वेगवेगळ्या योजनांद्वारे १३ टक्के व्याज देऊ, असे आश्वासन देऊन बीएचआर पतसंस्थेने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्यानंतर संचालक मंडळाविरुद्ध शहरात दोन गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर वर्षभरापूर्वी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता,हे येथे उल्लेखनीय.
बीएचआरचे संस्थापक चेअरमन प्रमोद भाईचंद रायसोनी (६८, रा. जळगाव), अध्यक्ष दिलीप कांतीलाल चोरडीया (६०) यांच्यासह संचालक मोतीलाल ओकांर जिरी, सूरजमल भबुतमल जैन, भागवत संपत माळी, दादा रामचंद्र पाटील, राजाराम काशिनाथ कोळी, भगवान हिरामण वाघ, हितेंद्र यशवंत महाजन, इंद्रकुमार आत्माराम लालवानी, शेख रमजान शेख अब्दुल नबी, सुखलाल शहाबू माळी, यशवंत ओंकार जिरी (सर्व रा. जळगाव ) यांना सीआयडीने गुरूवारी रात्री जळगाव कारागृहातून ताब्यात घेतले. बीएचआर पतसंस्थेच्या अमरावती शहरात राजापेठ खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा दोन शाखा तर अंजनगाव सुर्जीमध्ये एक अशा जिल्ह्यात तीन शाखा आहे. यापैकी राजापेठ पोलिस ठाण्यात डॉ. राध्येशाम मुंधडा यांनी तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी १५ जून २०१४ ला बीएचआरच्या संस्थापकासह संचालक मंडळाविरुध्द गुन्हे दाखल केले होते. राजापेठ ठाण्यात १० कोटी ५२ लाखांचा तर उर्वरीत खोलापुरी गेट अंजनगाव सुर्जी ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये जवळपास चार कोटींची फसगत झाल्याची तक्रार आहे ही कारवाई सीआयडी अमरावतीचे उपअधीक्षक एस.डी. सोळंके यांच्यासह गजानन पवार, नितीन पेठे, विशाल मोहतुरे यांच्या पथकाने केली आहे.
‘बीएचआर’वरकेंद्राचा प्रशासक: गुंतवण्ूकदारांनाठेवींवर अधिक व्याजदराचे आमिष दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी बीएचआरमध्ये गुंतवणूक केली. मात्र कालांतराने रक्कम परत करता पतसंस्थांना टाळे लागले. त्यामुळे केंद्र शासनाने बीएचआर पतसंस्थेला अवसायनात काढून त्यावर केंद्र शासनाचाच प्रशासक नेमला आहे. सद्या प्रशासक कार्यरत आहे.
बातम्या आणखी आहेत...