आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव वाहनाने एक्स्प्रेस हायवेवर बिबट्याला चिरडले, रस्त्यापासून 25 फूट लांब अंतरावर फेकल्या गेला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावतीते बडनेरा एक्सप्रेस हायवेवर मंगळवारी (दि. २७) पहाटे एका भरधाव वाहनाने रानडुकर आणि अंदाजे सात वर्षीय बिबट्याला चिरडले. यामध्ये रानडुकराचा चेंदामेंदा झाला तर बिबट रस्त्यांपासून जवळपास २५ फूट लांब फेकल्या गेला. यामध्ये या दाेन्ही प्राण्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही धडक इतकी गंभीर होती, बिबटचा स्पायनल कॉर्ड पुर्णपणे तुटला होता तसेच मागील उजवा पायसुद्धा निकामी झाला होता.
 
एक्स्प्रेस हायवेवरून नेहमीच भरधाव वाहतूक सुरू राहते. या ठिकाणी अनेकदा कुत्रे, मांजर मृतावस्थेत दिसून येतात. मंगळवारी सकाळी परिसरातील नागरिकांना एक्स्प्रेस हायवेच्या बाजूला एक बिबट तसेच काही अंतरावर चेंदामेंदा झालेले रानडुक्कर दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी पोलिस वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृत बिबटला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शहरातील पशुचिकीत्सलयात आणले. दरम्यान अपघातात मृत्यूमुखी पडलेला बिबट ही मादी जातीची होती. तसेच तिचे वय जवळपास सात ते आठ वर्ष असल्याचे सांगण्यात आले. बिबटचा या भागात वावर असल्याचे यापुर्वीही अनेकदा पुढे आले होते. मात्र एक्स्प्रेस हायवेवर प्राणी येऊ नये, यासाठी वनविभागाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. या घटनेमुळे वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
बिबटचा स्पायनल कॉर्ड मोडला
अज्ञातवाहनाच्याधडकेत बिबटचा मागील उजवा पाय तसेच स्पायनल कॉर्ड पूर्णपणे तुटला आहे. सदर मादी बिबट होती. ही बाब शवविच्छेदनानंतर पुढे आली.स्पायनल कॉर्ड मोडल्यानंतर बिबटचे वाचणे कठीणच असते, असे तज्ज्ञांनी सांगितले.’’
- हरिश्चंद्र पडगव्हाणकर, आरएफओ, वडाळी.
बातम्या आणखी आहेत...