आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्‍येष्‍ठ नेते रा. सू. गवई यांचे निधन; उद्या होणार अमरावतीत अंत्‍यसंस्‍कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे संस्थापक अध्यक्ष आणि बिहार, सिकिम्‍म आणि केरळ या तीन राज्‍याचे राज्‍यपालपद भूषवलेले महाराष्‍ट्रातील ज्‍येष्‍ठ नेते रामकृष्ण सूर्यभान गवई (86) उर्फ रा. सू. गवई यांचे आज (शनिवार) येथील कृष्‍णा रूग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.
गवई यांचा 30 ऑक्‍टोबर 1929 मध्‍ये जन्‍म झाला होता. मागील दोन महिन्‍यांपासून गवई यांची प्रकृती खालावली होती. त्‍यामुळे नागपुरातील कृष्‍णा रुग्‍णालयात त्‍यांच्‍यावर उपचार सुरू होते. आज त्‍यांचे निधन झाले. गवई यांनी बिहार, सिक्कीम आणि केरळचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. अमरावती मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. 1968 ते 78 या कालावाधीत ते विधान परिषदेचे उपसभापती होते. गवई यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. आज सायंकाळी नागपूर येथील दीक्षा भूमीवर त्‍यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. उद्या (रविवार) अमरावती येथे त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येतील.
पुढील सलाइडवर वाचा रा.सू. गवई यांचा जीवनपट.....