आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"त्या' दुचाकी चोरट्यांना २० तासांत केले गजाआड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील मुऱ्हादेवी येथील एका व्यक्तीची दुचाकी शुक्रवारी (दि. ८) दर्यापूर बसस्थानकावरून चोरीला गेली होती. ही दुचाकी दर्यापुरातील दोघांनी चोरली स्वत:च्या घरी आणली. घरातील मंडळीना शंका येऊ नये म्हणून चोरीच्या दुचाकीची पूजासुद्धा केली. दरम्यान, शनिवारी (दि. ९) हीच दुचाकी विक्रीसाठी नेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांनाही पकडले आहे.

दुचाकीचे चोरी करणारे दर्यापुरातील रहिवासी असून मित्र आहेत. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास या दोघांनी दर्यापूर बसस्थानक परिसरातून एक दुचाकी (एम. एच. २७ एव्ही ८९०१) चोरली. ही दुचाकी मुऱ्हादेवी येथे राहणाऱ्या साबिर शेख यांची आहे. शुक्रवारी साबिर शेख काही कामानिमित्त दर्यापूरला आले होते. दरम्यान, दुचाकीची चोरी झाली. ही दुचाकी चोरी करून चोरट्यांनी स्वत:च्या घरी आणली. त्या वेळी चोरट्याच्या घरातील मंडळींनी त्याला विचारले की, दुचाकी कोठून आणली, कोणाची आहे. त्या वेळी त्याने सांगितली की, ही दुचाकी मी विकत घेतली आहे. दुचाकीची पूजा करा, त्या वेळी त्याच्या आईने दुचाकीची पूजासुद्धा केली. इतकेच नाही तर त्याने घरातील व्यक्तींना सांगितले की, ही दुचाकी विकून टाकतो. कारण त्या माध्यमातून काही कमिशन मिळते, असे सांगून ते दोघेही दुचाकी घेऊन बाहेर पडले. ही दुचाकी अकोट येथे विक्रीसाठी घेऊन ते जात होते. दरम्यान, ही माहिती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय नीलेश सुरडकर त्यांच्या पथकाला मिळाली होती.