आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनाच्या धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
घाटंजी - येथून सात किमी. अंतरावर सायखेडा ते दहेली गावादरम्यान घाटंजी रस्त्यावर मालवाहू गाडी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये येळाबारा येथील शिवशक्ती पुरुष बचत गटाचे सचिव सतीश नारायणराव डंभारे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार, जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली. 

सतीश डंभारे हा येळाबारा येथून कामासाठी स्वत:च्या दुचाकीने घाटंजीकडे जात होते. दरम्यान दहेली सायखेडा गावाच्या मध्यभागी भरधाव मालवाहू वाहनाने डंभारे यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात सतीशच्या डोक्याला, उजव्या हाताला, मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती येळाबारा गावात पोहोचताच त्याच्या नातेवाइकासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वडगांव (जंगल) पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. या वेळी पोलिस जमादार बाळू ससाने, बिट जमादार फुलके यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे पाठवला. सायंकाळी सर्व आप्तेष्ट, नातेवाईक गावकऱ्याच्या उपस्थित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीशच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...