आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅट्रासिटीच्या सन्मानार्थ बिरसा ब्रिगेड, भीम टायगर सेना रस्त्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद- अॅट्रासिटी कायद्याचा गौरवापर होत असल्याबाबत खोटी माहिती देऊन अनुसूचित जाती जमातीवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या राज ठाकरे, जांबुवंतराव धोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार बिरसा मुंडा ब्रिगेड, भीम टायगर सेना यांच्याकडून आज, दि. ऑगस्ट रोजी पुसद शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. तर एका मोर्चाद्वारे एसडीओंना निवेदन देऊन अन्याय करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

अॅक्ट्रासिटी रद्द करण्याच्या निर्माण झालेल्या वादाचे पडसाद पुसद शहरात आज पाहायला मिळाले. बिरसा मुंडा ब्रिगेडच्या विदर्भ संघटक पांडुरंग व्यवहारे, भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी तीन पुतळा चौकामध्ये जमून शहर पोलिस स्टेशनवर कोर्ट मार्गाने मार्गस्थ होऊन मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, ठाणेदार गजानन शेळके यांच्याकडे तक्रार देण्यात आली.

यावर सखोल चौकशी करुन सात दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन शेळके यांनी मोर्चेकऱ्यांना दिले. त्यानंतर सदर मोर्चा उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार राठोड यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यात खोडसाळ वृत्तीने राजकीय पक्षाचे राज ठाकरे, यांनी दि. २८ जुलै रोजी पुणे येथे, तर जांबुवंतराव धोटे यांनी यवतमाळात अॅक्ट्रासिटी कायद्याची गरज नाही. अॅक्ट्रासिटी कायद्याचा राजकिय लोक स्वत:च्या स्वार्थासाठी गैरवापर करीत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अनुसुचीत जाती, जमाती समाजामध्ये असंतोष निर्माण झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी घटनेमध्ये नमूद तरतुदीनुसार न्याय मिळतअहे. त्यामुळे होणारे अन्याय अत्याचार कमी झाले नसले तरी त्या कायद्याने आम्हाला सरंक्षण प्राप्त झाले असे नमूद केले आहे. या निवेदनावर मारोतराव वंजारे, पांडुरंग व्यवहारे, किशोर कांबळे, मारोती भस्मे, देवा जगताप, सुरेश धनवे, गिता कांबळे, मिनाक्षी व्यवहारे, विद्या गायकवाड, उषा देवकुळे, वनिता शरूकार, शारदा असोले, पार्वती काळे, रत्नमाला मळघणे, सुभद्रा कऱ्हाळे, दुर्गा व्यवहारे, अण्णा दोडके, संतोष सिंगारे, अनिल इंगोले, गजानन टारफे, संघपाल खंदारे, आकाश कांबळे, केशव चोपडे, सखाराम इंगळे, देवानंद पाईकराव, रमेश रहारी, गजानन वायकुळे, अनिल वाढवे, अश्विन ढेंबरे, विकास गायकवाड, शरद जमदाडे, शिवम मोरे, विशाल सरोदे, गजेंद्र मनवर, गौतम केवटे, उज्वला कांबळे, शुभम आत्राम, बबलु उतळे, अक्षय गरड, प्रदीप थोरात, बबलु जाधव, आकाश पांडे, सागर जामकर, पिंटु संगमवार, उत्तम वाठोरे, गौरव सडमाके, आकाश धुळे, आंबादास कांबळे, गजानन हिंगमिरे, यांच्या सह अनेकांच्या सह्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी घटनेमध्ये नमूद तरतुदीनुसार न्याय मिळत अाहे. अनुसूचित जाती, जमातीविरुद्ध अन्याय करणाऱ्यांना या कायद्याचा धाक असल्याने त्याविरुद्ध चुकीच्या वापराचा आरोप केल्या जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले असून यानंतर असा प्रयत्न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...