आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदाराची कंत्राटदाराला दमदाटी; कामाच्या ‘व्यवहारा’वरून धमकीची पोलिसांत तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ-  आर्णी- पांढरकवडा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी कामाच्या ‘व्यवहारा’वरून मोबाइलवरून दमदाटी केल्याची तक्रार गुरुवारी कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांनी पोलिस ठाण्यात केली. आमदार तोडसाम आणि कंत्राटदार शर्मा यांच्या चर्चेची ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.   
 
६ सप्टेंबर रोजी दुपारी आमदार तोडसाम यांनी कंत्राटदार शिवदत्त लखमीचंद शर्मा यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला होता. यात त्यांनी ‘व्यवहार’ पूर्ण करण्यासाठी दमदाटी केली. ‘माझ्या भागात तुम्ही कसे काम केले,’ असा वाक्याचा प्रयोग केला. काम करायचे असेल तर ‘व्यवहार’ पूर्ण करावाच लागेल, अशी धमकी दिली. हा वार्तालाप कंत्राटदार  शर्मा यांनी रेकाॅर्डिंग करून ठेवला. दरम्यान, ही ऑडिओ क्लिप गुरुवार रोजी व्हायरल झाली. त्यानंतर शर्मा यांनी गुरुवारी वडगाव रोड पोलिस ठाणे गाठून तक्रार सादर केली. तसेच अापल्या जिवाला धोका 
निर्माण हाेण्याची भीतीही तक्रारीत नमूद केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...