आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा 134, तर भाजपने केला 159 ग्रामपंचायतींवर दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यात झालेल्या २४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल मंगळवारी घोषित झाले असून, काँग्रेसने १३४, तर भाजपने १५९ ग्रामपंचायतींवर वर्चस्वाचा दावा केला आहे. त्यामुळे ४३ ग्रामपंचायतींवर नेमके सरपंच कोणत्या पक्षाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
जिल्ह्यात २५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या. यापैकी सहा ग्रामपंचायती अविरोध झाल्या. उर्वरित २४९ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका घेण्यात आल्या. यावेळी प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडून द्यावयाचा असल्याने ही निवडणूक नाविन्यपूर्ण ठरली होती. दरम्यान, केंद्र राज्यात भाजपचे सरकार असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत पक्षाचे चिन्ह देण्यात आल्याने नेमके कोणत्या पक्षाने किती ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले हा विषय चर्चेचा ठरला आहे. दरम्यान, स्थानिकांच्या मते या निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाल्याचे म्हणणे असून काँग्रेसने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, निवडणुकीचे निकाल आज सायंकाळी घोषित झाल्यानंतर भाजप, काँग्रेस या प्रमुख पक्षाने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा केला आहे. काँग्रेसने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १३४ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजप सरकारने तीन वर्षांपासून शेतकरी सर्वसामान्यांची केलेली दिशाभूल याचाच हा परिणाम असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी या पत्रकात म्हटले आहे. 
 
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी यांच्या म्हणण्यानुसार, १५९ ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व निर्माण केले. यात १३५ भाजपचे, तर २४ ग्रामपंचायतींवर भाजप समर्थित सरपंच निवडून आले आहेत. धारणी तालुक्यात १०, चिखलदरा १८, अचलपूर ११, चांदूर बाजार ५, मोर्शी, १८, वरुड ७, तिवसा ७, चांदूर रेल्वे ९, धामणगाव रेल्वे ५, नांदगाव खंडेश्वर ११, भातकुली २, अमरावती ५, दर्यापूर १५, तर अंजनगाव सुर्जी तालुक्यात १२ ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व असल्याचे सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...