आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP And Modi Killers Of Constitution Rahul Gandhi

भाजप व माेदी घटनेचे मारेकरी आहेत; राहुल गांधींचे टीकास्त्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - या देशात मनुवादी विचारधारेचे संरक्षक आणि मनुवादी विचारधारेचे आक्रमक अशा दोनच विचारधारा आहेत. संघ, भाजपा आणि मोदी या विचारधारेचे संरक्षक आणि घटनेचे मारेकरी आहेत. घटना मोडून त्यात स्वत: अनुकूल असे बदल त्यांना करायचे आहे. पण काँग्रेस त्यांचा डाव पूर्ण ताकदीनिशी हाणून पाडेल, असा इशारा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे दिला.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त काँग्रेसतर्फे आयोजित सभेत ते बोलत होते. कस्तुरचंद पार्क येथे आयोजित सभेला काँग्रेसचे झाडून सारे नेते उपस्थित होते. या वेळी बोलताना राहुल गांधी यांनी संघ व भाजपवर जोरदार टीका केली. सध्या या देशावर मोदी आणि संघाचेच राज्य आहे,असे सांगतानाच मनुवादाच्या संरक्षकांचा डाव उलथवून टाकू, असा कठोर इशारा त्यांनी दिला.

रोहित वेमुला प्रकरणाचा उल्लेख करताना लोकशाही व्यवस्था संपवण्याचे भाजपाचे प्रयत्न आहे, अशी टीका राहुल यांनी केली. संघ आणि भाजपावाले नेहमी मलाच लक्ष्य करतात. मी त्यांच्यासमोर झुकावे, असे त्यांना वाटते. पण मनुवादी विचारधारेसमोर मी कदापि गुडघे
टेकवणार नाही, असे ते म्हणाले. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकार दलितांना चिरडून टाकत असल्याचा आरोप केला. राज्यसभेत काँग्रेसचे बहुमत आहे म्हणून मोदी घटनेला हात लावू शकत नाही. मोदींचे बहुमत राज्यसभेतही असते तर आतापर्यंत घटनेची मोडतोड झाली असती, असे खरगे म्हणाले. सुशीलकुमार शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे समयोचित भाषण झाले.

नेत्यांची मांदियाळी
काँग्रेसच्या सभेला काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंग, शिवराज पाटील चाकुरकर, राज बब्बर, नारायण राणे, मोहसीना किदवई, अशोक गहलोत, राजीव शुक्ला, विलास मुत्तेमवार, आॅस्कर फर्नांडीस, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, अजित जोगी, वीरप्पा मोईली, सिद्धरामय्या असे राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील झाडून सारे नेते उपस्थित होते.

सोनिया गांधींचीही भाजपवर टीका, तीन वर्षांनंतर सोनिया गांधींची कस्तुरचंद पार्कवर सभा