आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे भाजपतर्फे जल्लोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालकमंत्री प्रवीण पाेटे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी कर्जमुक्तीचा जल्लोष केला. - Divya Marathi
पालकमंत्री प्रवीण पाेटे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी कर्जमुक्तीचा जल्लोष केला.
अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे शहर जिल्हा भाजप कार्यकारिणीतर्फे मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास इर्विन चौकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ढोल ताशे फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला.
 
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर डाॅ. पंजाबराव देशमुख यांच्या पंचवटी चौकातील पुतळ्यापर्यंत फेरी काढण्यात आली. या फेरीत भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
या ठिकाणी शिराळाचे देविदास टेंडू, भिवापूरचे गोपाल राठोड,नांदगावपेठचे सुरेशचंद्र अग्रवाल, दर्यापूरचे सतीश शहा, खोलापूरचे सुरेश भरेती, केकतपूरचे सागर रायकर यांचा साहित्य अन् बियाणे देऊन गौरव करण्यात आला. जल्लोषप्रसंगी तुषार भारतीय, जयंत डेहनकर, प्रा.दिनेश सूर्यवंशी, सतीश करेसिया, नितीन धांडे, प्रणय कुळकर्णी, अनिता राज, सारसकर, राधा कुरील, स्वाती कुळकर्णी, रिता मोकलकर, सुरेखा लुंगारे, किरण महल्ले, आत्माराम पुरसवानी, इंदू सावरकर, गोविंद काळेकर, सुनील सावरकर, संजय अग्रवाल, संजय अग्रवाल, नूतन भुपते, प्रमिला जाधव, सुचिता बेटे, लता देशमुख, वंदना मागे, रचना टापर, चंद्रकांत बोमरे, ललीत समदूरकर, रूपेश ढेपे, गजानन कोल्हे, जयंत आमले, सुनील जावरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...