आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Campaign For Babasaheb Ambedkar Birth Anniversary

भाजपचे ‘ग्रामोद्य ते भारत उदय’ अभियान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीणच्या वतीने महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १४ ते २४ एप्रिल हा कालावधी ‘ग्रामोद्य ते भारत उदय’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डाॅ. आंबेडकर यांचे सामाजिक विचार, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर युवा तथा महिला चळवळ, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रवाद, अशा विविध विषयांवर पंचायत समिती जिल्हा परिषद स्तरावर प्रबोधन वर्ग, सभा संगोष्टीचे आयोजन करण्यात येणार आहे.

१४ एप्रिल रोजी पंचायत समिती स्तरावर अभिवादन सभा होणार असून, या सभेमध्ये सामाजिक सलोखा राष्ट्रीय विचारांच्या आधारे गावांगावांमधील संबंध दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

१० एप्रिल रोजी कोल्लाम येथे आगीच्या तांडवात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवार,१२ एप्रिल रोजी सायंकाळी जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये त्या त्या परिसरातील भाजप कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे प्रा.सूर्यवंशी यांनी सांगितले.

ओबीसींसाठी क्रिमिलेअर मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सह्यांचे निवेदन देण्यात येणार असून, यासाठी भारतीय जनता युवा माेर्चातर्फे स्वाक्षरी अभियान राबवण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील पांदण रस्ते अन् विविध विकासकामात भरीव काम करणारे पालकमंत्री प्रवीण पोटे सर्व लोकप्रतिनिधींचा सत्कार तसेच कर्तव्यपूर्ती सोहळा २३ एप्रिल रोजी होणार आहे. या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचली जाणार असल्याचे प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी या वेळी सांिगतले.