आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात BJP नेत्याची \'दादागिरी\', नगरसेवकाची चक्क पोलिसांनाच शिवीगाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- भाजप आमदार अमित साटम यांचे शिवीगाळ प्रकरण ताजे असतानाच आता नागपुरातल्या गणेशपेठचे भाजप नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी आता चक्क पोलिसांनाच शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. भाजप नेत्याच्या 'दादागिरी'चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (व्हिडिओ शेवटच्या स्लाइडवर)  भाजप हा पार्टी 'विथ डिफरन्स'वरून 'पार्टी विथ शिवराळ' नेत्यांचा पक्ष आहे का? असाच सवाल उपस्थित झाला आहे.

काय आहे हे प्रकरण?
- ही घटना रविवारी सायंकाळी मोक्षधाम मार्गावर घडली.
- वैभव दीक्षित हा आपल्या मित्रासोबत जात होते. यादरम्यान पोलिस ड्रंक अॅण्‍ड ड्राइव्ह अंतर्गत गाड्यांची तपासणी करत होते.
- समोर पोलिसांना पाहाताच दीक्षितने आपली गाडी यूटर्न घेतली.
- पाऊस सुरु असताना गाडी घसरली व दीक्षितसह एक जण जमिनीवर पडले. या दुघटनेत दोघे किरकोळ जखमी झाले.
- घटनेनंतर नगरसेवक दयाशंकर तिवारी आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत गणेशपेठ पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पोलिस उपनिरीक्षकासह इतर पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली.
- पोलिस ठाण्यात दयाशंकर तिवारी यांच्या शिविगाळ करत असतानाचा व्हिडिओ एका महिला पोलिस कॉन्स्टेबलने आपल्या मोबाइलमध्ये शूट केला. आता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- दयाशंकर तिवारी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

नूतन रेवतकर यांचे पोलिस आयुक्तांना लेखी निवेदन..
- पोलिस ठाण्यास घुसून पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करणारे भाजपचे नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी समाजसेविका नूतन रेवतकर यांनी केली आहे.
- नूतन रेवतकर यांनी याबाबत पोलिस आयुक्तांना लेखी निवेदनही दिले आहे.
 
पुढील स्लाइडवर वाचा...भाजप आमदार अमित साटम यांनी दोन दिवसांपूर्वी फेरीवाल्यांना केली होती शिवीगाळ
बातम्या आणखी आहेत...