आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला 175 जागा मिळणार, बावनकुळेंचा दावा; मुख्यमंत्र्यांचे गुप्त सर्वेक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची करून घेतलेल्या गुप्त सर्वेक्षणात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला १७५ जागा मिळतील आणि फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री असतील, असा राजकीय संदेश आणि इशारा संबंधितांपर्यंत पोहोचविण्याची कामगिरी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी नागपुरात पार पाडली. पक्षात अधुनमधून नेतृत्वाबद्धल उठणारे आवाज क्षीण करण्यासह सत्तेतील मित्रपक्षावर कुरघोडीची संधी भाजपने या निमित्ताने साधली. 

नागपूर महानगर भाजपच्या कायकारिणी बैठकीपुढे बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी रविवारी जाहीरपणे कथित सर्वेक्षणाचा उल्लेख केला. राज्याच्या राजकारणावर मुख्यमंत्री फडणवीसांची मांड बऱ्यापैकी पक्की झाली असली तरी सारेच काही आलबेल असल्याची परिस्थिती नाही. राज्य सरकारच्या कारभाराबाबत भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोलेंच्या जाहीर शेरेबाजीची मालिका अद्यापही सुरुच आहे. अलिकडेच फुटबॉल च्या उपक्रमावरून चिमटे काढत पटोलेंनी राज्य सरकार शेतकऱ्यांना लुटत असल्याची जाहीर टिप्पनी केली. सध्या शांत असलेल्या मित्रपक्ष शिवसेनेवर कुरघोडीचा दुहेरी हेतूही यामुळे साध्य झाला आहे. 

रेड झोनमध्ये आमदार 
कथितअंतर्गत सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीरपणे सांगून केवळ कायकर्त्यांच्या टाळ्या घेण्याचा हा प्रकार नक्कीच नव्हता, अशी कुजबूज नागपुरातील कायकर्त्यांमध्येही सुरु आहे. विदर्भातील भाजपच्या किमान आठ आमदारांची कामगिरी रेड झोन मध्ये (धोक्याची पातळी) असल्याची चर्चा या सर्वेक्षणातून पुढे आल्याचे दावेही केले जात आहेत. त्यातील काही नावांची चर्चा सध्या भाजपच्या वर्तुळात सुरु असल्याने नाराज झालेल्या आमदार डॉ. मिलिंद माने यांनी प्रसार माध्यमांचे फारसे मनावर घेण्याचा सल्ला कायकर्त्यांना यानिमित्ताने दिला. 
बातम्या आणखी आहेत...