आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Leader Nitin Gadkari And Shatrughna Sinha In Nagpur

नितीन गडकरी, शत्रुघ्न सिन्हा आज नागपुरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले आहे. शंकर नगरातील साई सभागृहात ५.३० वाजता आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व खासदार शत्रूघ्न सिन्हा यांची प्रमुख उपस्थिती राहील.
या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्यासाठी सिन्हा शुक्रवारी रात्रीच नागपुरात आले. वर्धारोडवर स्थित हाॅटेल रॅडीसन ब्ल्यू येथे त्यांचा मुक्काम आहे. बिहार निवडणुकीतील पराभवानंतर सिन्हा यांनी मोदी आणि शाह या दोघांवर निशाणा साधला होता. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या सुरात सूर मिळवत सिन्हा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली. सरसंघचालक मोहन भागवत तसेच सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची ते भेट घेतील, अशी चर्चा होती. मात्र, सध्या दोघेही नागपूरबाहेर असल्याने तशी शक्यता नाही. दरम्यान, या वेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.