आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP MLA Mallikarjun Reddy Protest Against Beer Bar At Nagpur

भाजप आमदार रेड्डींचा रिसॉर्टवर सशस्त्र हल्ला, मुख्यमंत्र्यांनी बोलावून झापले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावले जात असतानाच त्यांच्याच पक्षातील आमदाराने आपल्या सशस्त्र कार्यकर्त्यांसह रामटेक येथे धुमाकूळ घातल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांना रामगिरी बंगल्यावर बोलावून झापल्याचे सूत्रांनी सांगितले.

मल्लिकार्जून रेड्डी हे भाजपचे रामटेकचे आमदार असून, पहिल्यांदाच निवडून आले आहेत. बजरंग दलाने रविवारी अयाेध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी नागपूर ते रामटेक स्कूटर फेरी काढली होती. ही फेरी रामटेक येथे पोहोचल्यावर तेथील गडमंदिरात पूजा करून राममंदिराच्या निर्मितीचा संकल्प सोडला. मात्र, त्यानंतर काही कार्यकर्ते जवळच्या राजकमल रिसॉर्टवर गेले. तेथे काहींनी मटणावर ताव मारत मद्यप्राशन केले. मात्र, त्यानंतर तासाभरातच आमदार मल्लिकार्जून रेड्डी हे सुमारे शंभर कार्यकर्त्यांसह तेथे पोहोचले. अनेक कार्यकर्त्यांच्या हातात काठ्या व तलवारीदेखील होत्या. त्यांनी या रेस्टॉरंटमध्ये दारू व मटण विकायचे नाही, असा दावा करीत तोडफोड सुरू केली. रेस्टॉरंटसमोरील कुंड्या, शेड तसेच खुर्च्यांची नासधूस केली. सायंकाळी सहा ते सात च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर राजकमल रिसॉर्टचे व्यवस्थापक राजू रघुते यांनी रामटेक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे आमदार रेड्डी यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हे नोंदवले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी झापले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी नागपुरात होते. सायंकाळी त्यांनी रेड्डी यांना रामगिरी बंगल्यावर बोलावून त्यांना चांगलेच झापल्याची माहिती सूत्रांनी दिली. अामदार रेड्डी हे नितीन गडकरी यांचे समर्थक मानले जातात.