आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजप आमदार परिणय फुके यांच्याविरुद्ध अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घनश्याम चौधरी यांना जीवघेणी मारहाण केल्याच्या अाराेपावरून ही कारवाई करण्यात अाली.  
 
नागपूरच्या अंबाझरी हिलटाॅप परिसरातील रामनगर वाॅर्डात आमदार परिणय फुके व घनश्याम चौधरी यांच्यात वाद सुरू होते. फुकेंच्या विरोधातील एक निनावी पत्रक मतदानाच्या दिवशी सोशल मीडियावरून फिरले. हे पत्रक चौधरी यांनी काढल्याचा संशय फुकेंना होता. त्यावरून दोन्ही गटांत एकमेकांविषयी राग हाेता. मंगळवारी महापालिकेचे मतदान संपल्यानंतर फुके समर्थकांना घनश्याम चौधरी हिलटाॅप परिसरात फिरताना दिसले. 
या वेळी त्यांच्यात झालेल्या वादावादीचे पर्यवसान चौधरी यांना मारहाण करण्यात झाले. ही मारहाण आमदार परिणय फुके, त्यांचे बंधू आणि सहकाऱ्यांनी केली, असा आरोप चौधरींनी पाेलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला होता. दरम्यान, मारहाणीनंतर चाैधरींच्या समर्थकांनी अंबाझरी पोलिस ठाण्याला घेराव घालून फुकेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली हाेती.
 
 आमदार परिणय फुके व त्यांचे सहकारी अमर बागडे, गोमाजी घारे, मनोज लोंदे व इतर ५० ते ६० जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांनी दिली. या सर्व गुन्ह्यांत किमान सात वर्षांची शिक्षा होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सात वर्षे व त्या आत शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये तातडीने अटक करण्याची आवश्यकता नाही. न्यायालयात आरोपपत्र दाखल करून हजर राहण्यास सांगितले जाते.
बातम्या आणखी आहेत...