आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: पोलिसाच्‍या कानशिलात लगावणा-या भाजप आमदाराचे आत्‍मसमर्पण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारा- भंडारा येथील भाजपाचे आमदार रामचंद्र अवसरे यांनी एका पोलिसाच्‍या कानशिलात लगावली होती. एका मिरवणूकीतून आमदाराची कार चालत होती. पोलिसाने आमदाराच्‍या कारचालकाला कार बाजूला घेण्‍यास सांगितले. यावरुन हा वाद निर्माण झाला. आमदाराची ही दबंगगीरी कॅमे-यात कैद झाली. पोलिसाला मारहाण केल्‍याप्रकरणी आमदाराच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. त्‍यानंतर आज भाजप आमदार रामचंद्र अवसरे यांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे.
काय आहे पूर्ण प्रकरण..
- भंडाराच्‍या तुमसरमध्‍ये बुधवारी रात्री स्वातंत्र्य दिनाच्‍या पार्श्‍वभूमीवर भाजपाच्‍या मिरवणूकीचा कार्यक्रम होता. याचवेळी काही भाजप कार्यकर्ते आमदार अवसरे यांच्‍या कारमध्‍ये बसून कार्यक्रम रेकॉर्ड करत होते. गर्दीत असलेल्‍या या कारमुळे वाहतूकीस अडथडा होत होता. कार्यक्रमात कोणताही व्‍यत्‍यय येऊ नये म्‍हणून कांस्टेबल राजू साठवने यांनी कार चालकाला कार बाजूला घेण्‍यास सांगितले. आमदाराचा कारचालक व पोलिसात यावरुन चांगलाच वाद झाला. कार्यक्रम संपल्‍यावर आमदार रामचंद्र पोलिस स्‍टेशनमध्‍ये गेले व त्‍यांनी पोलिस इंस्पेक्टरच्‍या समोरच राजू साठवनेच्‍या कानशिलात लगावली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, कॅमे-यात कैद झाली, आमदाराची दबंगगीरी..
अखेरच्‍या स्‍लाइड्सवर पाहा, व्‍हिडियो..
बातम्या आणखी आहेत...