आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धामणगाव रेल्वे नगरपालिकेत भाजपच्या हॅट्रीकचा 'प्रताप'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे - येथीलनगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने हॅट्रिक साधली असून, भाजप-सेना, आठवले गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रताप अडसड तब्बल हजार ६०८ मतांनी विजयी झाले. नगरसेवकांच्या १७ जागांपैकी १५ जागेवर भाजपने विजय संपादन केल्याने भाजपची निर्विवाद सत्ता स्थापण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीतही कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागला.

पालिकेच्या निवडणुकीसाठी सकाळ दहा वाजतापासून मतमोजणीला सुरवात झाली. पहिल्या फेरीपासून प्रताप अडसड यांनी आघाडी टिकवून ठेवली. आठ प्रभागातील १७ पैकी १५ जागा भाजपने पटकावल्या. पहिल्या प्रभागातील पहिल्या जागेवर भाजपचे सुनील जावरकर हे ५११ मते अधिक घेऊन विजयी झाले. जावरकर यांना ८६४ तर कॉंग्रेसचे नंदकुमार मानकर यांना ३५३ मते मिळाली. येथील दुसऱ्या जागेवार भाजपच्या कल्पना किशोर देशमुख २४४ अधिक मते मिळवून विजयी झाल्या. कल्पना देशमुख यांना ४७६ मते मिळाली. दुसऱ्या प्रभागात भाजपचे रवी कावळे यांना ८२ मतांनी पराभव पत्करावा लागला. येथून राकॉचे विनोद तलवारे ७०९ मते मिळवून विजयी झाले. कावळे यांना ६२७ मते मिळाली. बसपाचे नितेश लक्षणे यांना ५१ मते मिळाली. तिसऱ्या प्रभागातील पहिल्या जागेवर भाजपच्या सिमा राजेश देवतळे १७९२ मते मिळवून विजयी झाल्या. कॉंग्रेसच्या सुधा चिंचे यांना ६४४ मते मिळून पराभव पत्करावा लागला. येथील दुसऱ्या जागेवर भाजपच्या दर्शना गणेश ठाकूर १७८७ मते मिळवून विजयी झाल्या. कॉंग्रेसच्या नंदा जगताप यांना केवळ ६१७ मते मिळाली. तिसऱ्या जागेवर भाजपचे संतोष गोविंद पोळ १७८२ मते मिळवून विजयी झाले. राकॉचे राजेंद्र अग्रवाल यांना ६४० मतांवर समाधान मानावे लागले. चौथ्या प्रभागात कॉंग्रेसच्या शुभांगी आठवले ८१६ मते मिळवून विजयी झाल्या. भाजपच्या वेदिका बोरकर यांना ८०३ मते मिळाली. बसपच्या इंदिरा डांगे यांना १३२ मते मिळाली. दुसऱ्या जागेवर भाजपचे हेमकरण कांकरिया ८५९ मते मिळवून दुसऱ्यांदा नगरसेवक झाले. त्यांनी अमोल मुंधडा यांचा १०६ मतांनी पराभव केला. मुंधडा यांना ७५३ मते मिळाली.

भाजपच्या विजयात दत्तापूरचा मोठा वाटा :
मागील निवडणुकीच्यावेळी दत्तापूर भागातून कॉंग्रेसचे पाच उमेदवार विजयी झाले होते. मात्र यावेळी सर्वच जागांवर भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले. पाचव्या प्रभागातील पहिल्या जागेवर पुष्पा मुलवंडे यांना ७२४ मते मिळाली. कॉंग्रेसच्या शीतल तुपट यांना ६७३ मते मिळाली. दुसऱ्या जागेवर भाजपचे देवकर रॉय ५८२ मते मिळवून िवजयी झाले. कॉंग्रेसचे संतोष पळसापुरे यांना ४२० तर अपक्ष सुरेश भागडकर यांना ३१७ मते मिळाली. सहाव्या प्रभागात भाजपचे विनोद धुवे १०४५ मते मिळवून विजयी झाले. राकॉचे मंगेश ठाकरे यांना ३८३ मते मिळाली. दुसऱ्या जागेवर भाजपच्या राजूदेवी राधेश्याम मुधंडा ९५० मते मिळवून विजयी झाल्या. कॉंग्रेसच्या नंदा भोगे यांना ४३७, बसपाच्या माधुरी सावध यांना ५६ मते मिळाली. सातव्या प्रभागात भाजपचे शुभम किन्नाके ८०१ मते मिळवून विजयी झाले. कॉंग्रेसचे कैलास उईके यांना ६२३ मते मिळाली. येथील दुसऱ्या जागेवर भाजपच्या अर्चना ठाकरे ८२८ मते मिळवून विजयी झाल्या. कॉंग्रेसच्या मनीषा ठाकरे यांना ५२६, बसपच्या चंदा अर्जुने यांना ७६ मते मिळाली. आठव्या प्रभागातील पहिल्या जागेवर भाजपचे बंडू पाटील ७०३ मते मिळवून विजयी झाले. कॉंग्रेसचे अशोक बोदिले यांना ५९८, बसपचे आशिष काळपांडे यांना १६७ मते मिळाली. येथील दुसऱ्या जागेवर भाजपच्या सारिका माकडे ९९१ मते मिळवून विजयी झाल्या. कॉंग्रेसच्या दुर्गा येरपुुडे यांना ६१४, बसपच्या भुमिका बोधिले यांना १७१ मते मिळाली.

पाच वर्षांमध्ये शहराचा चेहरामोहरा बदलणार
^मागीलदहावर्षात भाजपने शहराचा सर्वांगिण विकास केला. त्यामुळे शहरातील मतदारांनी विकासाला पाठिंबा दिला आहे. पुढील पाच वर्षात शहराचा चेहरामोहरा बदलविण्यात येईल.'' -अरूण अडसड, माजी आमदार
तासाभरात ४४ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला
येथील तहसील कार्यालयात सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात झाली. तासाभरातच नगराध्यक्षपदाच्या पाच नगरसेवकपदासाठी रिंगणात असलेल्या ४४ उमेदवारांची मते घोषित करण्यात आली. मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नरेंद्र फुलझेले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुमेध अलोणे, निवडणूक निरीक्षक चंदनसिंग राठोड, तहसीलदार सी. सी. कोहरे, नायब तहसलिदार ताकसांडे, खंडेझोड यांनी सहकार्य केले. दत्तापूरचे निरीक्षक अशोक लांडे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
बातम्या आणखी आहेत...