आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिहीनांची ‘डोळस’ कामगिरी, अमरावतीच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सुदृढ शरीराच्या खेळाडूने यशाची शिखरं काबीज करणे ही नैसर्गिक बाब मानली जाते. कोणतेही यश संपादन करण्यासाठी प्रचंड मेहनत, प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द अन् चिकाटी लागते. परंतु, शारिरीक व्यंगावर मात करून एखाद्या दृष्टिहीन खेळाडूने विक्रमी पदकं जिंकल्यास दृष्टिहीनाची ही ‘डोळस’ कामगिरी नैराशाच्या गर्तेत चाचपडणाऱ्यांसाठी दीपस्तंभ ठरू शकते. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या पॅराऑलम्पिक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये शहरातील डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयाच्या नऊ दृष्टिहीन जलतरणपटूंनी चपळ कामगिरीची चुणूक दाखवून एकूण ४६पैकी ३० पदकांची कमाई करून अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे नऊही जलतरणपटूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पॅराऑलम्पीक स्विमिंग असो. ऑफ महाराष्टाच्यावतीने ऑक्टोंबरला पुणे येथे दहावी राज्यस्तरीय पॅराऑलम्पिक जलतरण स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यातून जवळपास १६० ते १७० जलतरणपटूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये अमरावतीवरून गेलेल्या जलतरणपटूंपैकी दोन मुली सात मुलांनी सरस कामगिरी करून स्पर्धेत तब्बल ३० पदक आपल्या ताब्यात घेतले. यामध्ये ११ सुवर्ण, १२ रौप्य तर कांस्य पदाकांचा समावेश आहे. या कामगिरीमुळे पुन्हा एकदा अमरावतीकरांचा क्रीडा क्षेत्रातील दबदबा कायम राहिला आहे. ही कामगिरी करणाऱ्या दृष्टिहीन जलतरणपटूंमध्ये श्रेया देशमुख, मेघा पांडे, अंकुश अंबलकार, शैलेशकुमार कास्देकर, आनंद बारस्कर, आदित्य डापसे, किरण चव्हाण, एकनाथ आमझरे मेघराज जाधव यांचा समावेश आहे. पुणे येथे झालेल्या स्पर्धेत या जलतरपटूंनी जलतरणाच्या फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्टोक बटरफ्लाय या चारही प्रकारात पदक पटकावले आहे.

डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयाचे शिक्षक या जलतरणपटूंचे प्रशिक्षक प्रशांत गाडगे हे जलतरणपटूंना हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात धडे देतात. शाळेचे सचिव प्रवीण मालपाणी मुख्याध्यापक नवनाथ इंगोले तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकर वैद्य, डॉ. खंडागळे योगेश निर्मळ यांचे मार्गदर्शन या जलतरपटूंच्या यशात महत्वाचे ठरले आहे.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मागील अनेक वर्षांपासून या जलतरपटूंना सरावासाठी विनामूल्य तरणतलाव उपलब्ध करून दिला आहे.

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत अमरावतीच्या नऊ जलतरणपटूंनी मिळून ३० पदक प्राप्त केले आहे. या नऊही जलतरपटूंची नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमधील उदयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली असून हा संघ पुढील महिन्यात रवाना होईल.

श्रेयाला चारही प्रकारात सुवर्ण
श्रेया देशमुख ही १७ वर्षीय दृष्टिहीन जलतरपटू आहे. श्रेयाने पुण्यात झालेल्या स्पर्धेत १०० मीटरमध्ये फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्टोक बटरफ्लाय या चारही प्रकारात निर्वावाद वर्चस्व गाजवून चार सुवर्ण पदकं प्राप्त केले. राष्ट्रीय स्पर्धेत आपल्याला यापेक्षा उजवी कामगिरी करायची असल्याचा मानस श्रेयाने व्यक्त केला आहे.

^आमच्या जलतरणपटूंनीराज्यस्तरीय स्पर्धेत ४६ पैकी ३० पदके मिळवली असून, राष्ट्रीय स्पर्धेत यापेक्षाही सरस कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. प्रशांतगाडगे, प्रशिक्षक.

बातम्या आणखी आहेत...