आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीच्या फटाक्यांवर प्रदूषण मंडळाची नजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दिवाळी म्हटले की सर्वांच्या उत्साहाला उधाण येते. या सणाला फटक्यांची आतषबाजी करण्याची प्रथा असल्यामुळे आतापासून शहरात फटाक्यांची दुकाने सजली आहेत. परंतु, यंदाच्या दिवाळीत कमीत कमी फटाके फोडून शरीर, पैसा पर्यावरणाचा ऱ्हास टाळा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयासह, समाजसेवी संस्थांद्वारे करण्यात आले आहे.
नुकतीच आॅक्टोबर रोजी प्रदुषण नियंत्रण मंडळ,अमरावती कार्यालयातर्फे सकाळी ११ ते दु. १२.३० या कालावधीत कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, किरण नगर येथे फटाक्यांची ध्वनी स्तर चाचणी घेण्यात आली. या चाचणीत पारदर्शकता बाळगण्यासाठी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कोणालाही सांगता ऐनवेळी फटाके खरेदी करून ते एमपीसीबी, विस्फोटक विभाग, पोलिस आणि पर्यावरण एनजीओंच्या उपस्थितीत ते फोडले. या चाचणीत फटाक्यांचा आवाज पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत तपासण्यात आली. हा आवाज १२० डेसीबलपर्यंत किंवा जास्तीत जास्त १४५ डेसीबलपर्यंत आहे की नाही ते यंत्राद्वारे तपासण्यात आले. हा अहवाल केंद्राकडे पाठवण्यात आला. याआधारे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणत्या फटाक्यावर बंदी घालायची याबाबत निर्णय घेत असते. अशी माहिती एमपीसीबीच्या विभागीय अधिकाऱ्यांनी दिली.

वायू, ध्वनी प्रदूषण रोखण्यास हातभार लावा
^नागरिकांनी फटाकेफोडणे टाळून किंवा परंपरेनुसार फारच कमी फटाके फोडून वायू ध्वनी प्रदूषण रोखण्यास हातभार लावावा. त्यातून निघणाऱ्या घातक वायूमुळे मेंदू, फुफ्फुस, श्वसनावर परिणाम होतो. फटाके कमी फोडल्याने पैशाची बचत तर होईलच शिवाय आरोग्यावर विपरित परिणामही होणार नाही. रा.म. वानखेडे, प्रादेशिक अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,अमरावती.

चायना फटाक्यांवर बंदी
दोनवर्षां आधी चायनाचे फटाके जप्त करण्याची मोहीम राबवण्यात आली होती. या फटाक्यांचा आवाज हा प्रदुषण नियंत्रण मंडळाने ठरविलेल्या डेसीबलच्या मानकांपेक्षा जास्त होता. तसेच त्यामुळे वायू प्रदुषणही होत होते. यावेळीही फटाके विक्रेता चायना फटाके विकत तर नाही ना याचाही आम्ही शोध घेतला. मात्र कुठेही असे फटाके आढळले नाहीत, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...